बंगलोर विरुद्ध लखनऊ जायन्ट्स चा होणार सामना, तर आज या खेळाडूंना भेटणार मोका तर हे खेळाडू बसणार बाहेर
आयपीएल चा २०२३ वा १५ वा सामना हा बंगलोर च्या चिन्हस्वामी स्टेडियम मध्ये होणार असून आज एकमेकांच्या समोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स हे संघ असणार आहेत. आतापर्यंत रॉयल बंगलोर ने एक सामना जिंकला आहे तर लखनऊ ने आतापर्यंत २ सामने जिंकले आहेत. आज रॉयल बंगलोर च्या होमग्राउंड मध्ये मॅच होणार असल्याने रॉयल बंगलोर पूर्णपणे आजचा सामना आपल्या हातात घेण्याच्या तयारीत आहेत. आज रॉयल बंगलोर च्या सर्व चाहत्यांची नजर ही विराट कोहली च्या बॅटिंग वर असणार आहे. जे की आता या संघात कोण ११ खेळाडू असणार आहेत ते सर्व पाहू.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाची आपण चर्चा केली तर बंगलोर हे दोन मॅचपैकी एक मॅच जिंकली आहे. जे की मागच्या मॅचमध्ये त्यांनी सामना जिंकला आहे. फाफ डूप्लेसिस सध्यातरी लगेच आपल्या संघात बदल करणार नाहीत. सध्यातरी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये वैन परनेल आले आहेत मात्र अजून तरी त्यांना खेळण्याचा चान्स भेटला नाही. कारण सध्यातरी सर्व खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. मात्र सध्या संघातील खेळाडू कोणत्या नंबर ला खेळण्यासाठी पाठवायचे ते गरजेचे आहे कारण मागील सामन्यात अशामुळे त्यांना हार मानावी लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चे आजचे ११ खेळाडू :-
फाफ डुप्लेसिस (कप्तान), विराट कोहली, ग्लेन मैक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, माइकल ब्रेसवेल, डेविड विली, मोहम्मद सिराज.
लखनऊ सुपर जायन्ट्स या संघाबद्धल बोलायचे म्हणले तर क्विंटन डिकोक सध्या टीम ला जोडले गेले आहेत मात्र अजूनही त्यांना खेळायचा चान्स भेटला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मार्क्स स्टोईनिस ला आज बाहेर बसवू शकतात असे सांगितले जात आहे. जे की या ऐवजी गौतम तसेच मिश्रा ला संघात पुन्हा जागा भेटण्याचे चान्सेस आहेत. बाकी पूर्ण संघ आहे तसाच राहील असे सांगण्यात आले आहे.
लखनऊ सुपर जाएंट्समध्ये खेळणार हे ११ खेळाडू :-
केएल राहुल (कप्तान), काइल मेयर्स (विकेटकीपर), निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पांड्या, मार्कस स्टोइनिस/क्विंटन डिकॉक, दीपक हुड्डा, यश ठाकुर, जयदेव उनादकट, के गौतम/अमित मिश्रा, मार्क वुड और रवि बिश्नोई.