- Advertisement -

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टी-२० फोर्मेटला या 5 खेळाडूनी टेस्ट बनवून सोडले होते, गोगलगाईपेक्षाही कमी गतीने काढल्यात धावा…

0 0

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टी-२० फोर्मेटला या 5 फलंदाजांनी टेस्ट बनवून सोडले होते, गोगलगाईपेक्षाही कमी गतीने काढल्यात धावा…


नमस्कार मित्रांनो! गोगलगाय हा प्राणी तुम्ही पाहिला असेल. किंवा त्याबाबत तुम्ही ऐकून असाल. हा प्राणी खूप हळूहळू चालतो. म्हणजे इथून तीन फुटावर जरी त्याला जायचे असले तरी त्याला साधारणता तीन तास लागतात. इतकी त्याची गती कमी असते. क्रिकेटमध्ये विशेषता T-20 फॉर्मेट मध्ये असे काही भारतीय खेळाडू आहेत की ज्यांची गती फारच कमी आहे. याच चार-पाच खेळाडूबाबत आपण या लेखामध्ये माहिती करून घेणार आहोत.

या खेळाडूंची गती इतकी मंद आहे की ते जर खेळले तर एक तर मॅच गमवावी लागते किंवा मग आपली इज्जत सांभाळण्यासाठी कसातरी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या खेळाडूंना फारशी पसंती या फॉरमॅटमध्ये दिली जात नाही. अशातच सगळीकडे जेव्हा आयपीएलचा धुमाकूळ चालू असताना अशा या रणधुमाळीत या खेळाडूंनी नेहमीच प्रेक्षकांना आणि आपल्या संघाला निराश केले आहे. रण काढण्याची यांची गती मंद असल्यामुळे या लोकांना टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये गोगलगाय म्हणून संबोधतात.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

खेळाडू

यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटपटू ‘अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). अजिंक्य रहाणे हा खेळाडू एकदिवसीय सामन्यांमध्ये फार चांगली कामगिरी करतो. मात्र जेव्हा टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये दणक्यावर दणके द्यायचे असते तेव्हा मात्र याला ते जमत नाही. आणि म्हणून सुमारे दीडशे टी ट्वेंटी मॅचेस खेळून सुद्धा केवळ ४००० रण अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane).च्या नावावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट केवळ १२१ इतका आहे. त्यामुळेT20 मध्ये अजिंक्य राहाणेला फारसे कोणी पसंत करत नाही.

गेल्या अनेक वर्षापासून रहाणे टी-२० मध्ये जास्त धावा करू शकला नाही मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये रहाणे जबरदस्त पद्धतीने गोलंदाजांची धुलाई करतोय..  यंदाच्या आयपीएलपुरता का होईना धोनीच्या (Ms Dhoni)नेतृत्वात रहाणे पुरेपूर टी-२० फलंदाज  दिसतोय.

मनीष पांडे (Manish Pandey)

या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो भारतीय संघाचा  फलंदाज मनीष पांडेचा(Manish Pandey). मनीष पांडे हा खेळाडू कसोटी सामन्यात खूप गाजला. मात्र टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये याला चमक दाखवता आली नाही. तो तरुण जरूर असला तरी त्याला टी ट्वेंटी फॉरमॅट मधला विस्फोटक खेळ खेळता येत नाही. त्यामुळे त्याने १४८ सामन्यातून ३३६७ इतक्याच धावा केल्या आहे. केवळ १२१ इतकाच याचा स्ट्राईक रेट आहे.

खेळाडू

गौतम गंभीर (Goutam Gambhir)

कधीकाळी कोलकाता नाईट रायडर (KKR) आयपीएल संघाचे नेतृत्व करणारा गौतम गंभीर (Goutam Gambhir) हा देखील उतरत्या वयानुसार चमकदार कामगिरी न दाखवणाऱ्या खेळाडूंमध्ये जाऊन बसला. याचा स्ट्राइक रेट जरी दोन्ही दोन खेळाडूंपेक्षा जास्त असला तरी मात्र चमक आणि जी विस्फोटक बल्लेबाजी आयपीएल (IPL) मध्ये अपेक्षित असते ती करण्यात गौतम गंभीरला (Goutam Gambhir) अपयश आले आहे. त्यानी आपल्या धावा गोगलगाईच्या गतीनेच बनवल्या आहे.

खेळाडू

शिखर धवन (Shikhar Dhavan)

५२८५ रण नावावर करणारा शिखर धवन (Shikhar Dhavan) याचा स्ट्राईक रेट १२७ आहे. मात्र t20 सारख्या फॉर्मेटमध्ये जिथे केवळ छक्के(सिक्स) मारण्याची स्पर्धा लागली आहे अशांमध्ये हा स्ट्राईक रेट म्हणजे खूप कमी समजला जातो. त्यामुळे शिखरधवनला सुद्धा गोगलगाय असेच म्हणावे लागेल.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.