यंदाच्या रणजी सीजनमध्ये सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत टॉप 5 खेळाडू; यादीत मुंबईचा एकही खेळाडू नाही!

यंदाच्या रणजी सीजनमध्ये सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत टॉप 5 खेळाडू; यादीत मुंबईचा एकही खेळाडू नाही!

रणजी क्रिकेट 2023- 24 चा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध विदर्भ या दोन संघात झाला. अजिंक्य रहाणे च्या नेतृत्वाखाली उतरलेल्या मुंबईच्या संघाने विदर्भवर 169 धावांनी विजय मिळवला. सांघिक कामगिरीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या रणजी चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे यंदाच्या रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह खेळाडूंमध्ये मुंबईचा एकही खेळाडू नाही.

रणजी ट्रॉफी 2024 मध्ये चमकले हे खेळाडू.

1.रिकी भुई

आंध्र प्रदेशचा फलंदाज रिकी भुई यंदाच्या रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. 27 वर्षीय रिकी भोईने आठ सामन्यात 75.16 च्या सरासरीने 902 धावा केल्या. यात चार शतके तर तीन अर्धशतकांचा समावेश होता. 175 ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली.

2.सचिन बेबी

केरळचा डाव्या हाताने फलंदाजी करणारा सचिन बेबी यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याने 12 डावातील सात सामन्यात 83 च्या सरासरीने 830 धावा केल्या होत्या. यात चार अर्धशतके व चार शतके ठोकली होते. 131 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.यंदाच्या रणजी सीजनमध्ये सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत टॉप 5 खेळाडू; यादीत मुंबईचा एकही खेळाडू नाही!

3.चेतेश्वर पुजारा

सौराष्ट्र क्रिकेट संघाचा महत्त्वाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याने आठ सामन्यात 69.8 च्या सरासरीने 829 धावा केल्या होत्या. त्याने 13 डावात तीन शतके आणि दोन अर्धशतके ठोकले होते. नाबाद 234 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. पुजाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्य राखता न आल्याने संघाबाहेर बसविण्यात आले.

4.एन. जगदीशन

तमिळनाडूचा फलंदाज एन. जगदीशन याने 9  सामन्यात 13 डाव खेळून ७४.१८ च्या सरासरीने 816 धावा केल्या होत्या. त्यात दोन शतके व एका अर्धशतकाच्या समावेश होता. 321 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

यंदाच्या रणजी सीजनमध्ये सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत टॉप 5 खेळाडू; यादीत मुंबईचा एकही खेळाडू नाही!

बडोदा संघातील 22 वर्षाचा खेळाडू शाश्वत रावत याने आठ सामन्यातील 13 डावात 60.3 च्या सरासरीने 784 धावा ठोकल्या होत्या. यंदाच्या हंगामात त्याने चार शतके व दोन अर्धशतके ठोकण्याचा कारनामा केला. 207 धावांची महत्त्वपूर्ण खेळी देखील त्याने केली.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *