Viral Video: “आर तू माणूस हाय का सैतान?” ट्रॅव्हिस हेडने टी-२० सामन्यात पहिल्या 14 चेंडूवर ठोकले सलग षटकार-चौकार; पहा व्हायरल व्हिडीओ..

0
37
Viral Video: आयपीएलनंतर ट्रॅव्हिस हेड घालतोय या स्पर्धेत धुमाकूळ, टी-२० सामन्यात पहिल्या 14 चेंडूवर ठोकले सलग षटकार,चौकार; पहा व्हायरल व्हिडीओ..

 ट्रॅव्हिस हेड: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि स्कॉटिश (aus vs scotland)  संघांमध्ये 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड (aus vs scotland) यांच्यातील ही पहिली द्विपक्षीय मालिका आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात एक मोठा विश्वविक्रम मोडला गेला आहे. हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मोडला आहे. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्येच इतक्या धावा केल्या की सगळेच अवाक् झाले. ऑस्ट्रेलियाच्या डावात भरपूर चौकार आणि षटकार पाहायला मिळाले.

Viral Video: आयपीएलनंतर ट्रॅव्हिस हेड घालतोय या स्पर्धेत धुमाकूळ, टी-२० सामन्यात पहिल्या 14 चेंडूवर  ठोकले सलग षटकार,चौकार; पहा व्हायरल व्हिडीओ..

Aus vs Scotland T20I मध्ये ट्रॅव्हिस हेडच्या फलंदाजीने हा विश्वविक्रम मोडला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटिश संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 154 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) त्याच्या टी-20 पदार्पणात खाते न उघडता बाद झाला. मात्र यानंतर ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांच्याकडून स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. पॉवरप्लेमध्येच दोन्ही खेळाडूंनी 113 धावा केल्या.  टी-20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये बनवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर आहे.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 102 धावा करण्याचा पराक्रम केला होता. पण ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श (Travis Head & Mitchell Marsh) यांच्या खेळीने हा विक्रम मोडीत काढला.  सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी मिळून सलग 14 चेंडूत चौकार आणि षटकार ठोकले. जे क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते.

Viral Video: आयपीएलनंतर ट्रॅव्हिस हेड घालतोय या स्पर्धेत धुमाकूळ, टी-२० सामन्यात पहिल्या 14 चेंडूवर ठोकले सलग षटकार,चौकार; पहा व्हायरल व्हिडीओ..

Aus vs Scotland : ट्रॅव्हिस हेडची विक्रमी खेळी

ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात 25 चेंडूत 80 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, ट्रॅव्हिस हेडने 320.00 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि 12 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचबरोबर पॉवरप्लेमध्ये त्याने एकूण 73 धावा केल्या. यासह तो पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. यापूर्वी 2020 मध्ये पॉल स्टर्लिंगने वेस्ट इंडिजविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 63 धावा केल्या होत्या. मात्र त्याचा हा विक्रम आता मोडीत निघाला आहे.


हे ही वाचा:

हा आहे जगातील सर्वात दुर्दैवी गोलंदाज, आजपर्यंत तब्बल एवढे षटके गोलंदाजी करूनही एकही विकेट मिळवू शकला नाहीये..

IND vs BAN test Series: बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी या दिवशी जाहीर होणार भारतीय संघ, तब्बल एवढ्या दिवसांनी परतणार धडाकेबाज फलंदाज..

PAK vs BAN: बांगलादेशने रचला इतिहास. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला लोळवले, जिंकली संपूर्ण सिरीज..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here