NZ vs BAN: वनडे क्रिकेटमध्ये ट्रेंट बोल्टचे ‘द्विशतक’, महान अष्टपैलू रिचर्ड हेडली यांना मागे टाकत नावावर केला हा मोठा विक्रम..

वनडे क्रिकेटमध्ये ट्रेंट बोल्टचे 'द्विशतक', महान अष्टपैलू रिचर्ड हेडली यांना मागे टाकत नावावर केला हा मोठा विक्रम..

वनडे क्रिकेटमध्ये ट्रेंट बोल्टचे ‘द्विशतक’, महान अष्टपैलू रिचर्ड हेडली यांना मागे टाकत नावावर केला हा मोठा विक्रम..


NZ vs BAN: आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (world Cup 2023) च्या अकराव्या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (trent boult)  याने नवा कारनामा केला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे बळी टिपण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो कीवी संघाचा सहावा गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्युझीलँड कडून सर्वाधिक बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. या विक्रमासह त्याने न्यूझीलंडचा माजी दिग्गज गोलंदाज रिचर्ड हेडली यांना पाठीमागे टाकले आहे. 

NZ vs BAN ट्रेंट बोल्डने पार केला 200 बळींचा टप्पा.

वनडे क्रिकेटमध्ये ट्रेंट बोल्टचे 'द्विशतक', महान अष्टपैलू रिचर्ड हेडली यांना मागे टाकत नावावर केला हा मोठा विक्रम..

ट्रेंट बोल्टने 107 सामन्यात दोनशे गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. बांगलादेश विरुद्ध झालेल्या या सामन्यात त्याने 10 षटकात 45 धावा देत दोन गडी बाद केले. त्याने लिटन दास आणि हरिदोए यांना बाद केले. यासह तो न्यूझीलंडकडून खेळताना सर्वात कमी डावात 200 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने 102 सामन्यात तर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुस्ताक याने 104 सामन्यात 200 गडी बाद केले होते. न्युझीलँडकडून वनडे क्रिकेटमध्ये डॅनियल व्हिटोरी याने सर्वाधिक 297 बळी घेतले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या 22 सामन्यांमध्ये बोल्टने 44 गडी बाद केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर याला मागे टाकले आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादी तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Trent Boult (@trrrent_)

NZ vs BAN सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने आयसीसी वनडे विश्वचषकाच्या 11 व्या सामन्यात बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. या विश्वचषकात न्यूझीलंडचा हा सलग तिसरा विजय आहे. चेन्नईच्या एमए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने केन विल्यम्सन आणि डॅरेल मिचल यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर 43 चेंडू आणि आठ गडी राखून बांगलादेशचा पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत जबरदस्त खेळी करत आहे. त्यामुळे या संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तसेच विश्वचषकात न्यूझीलंड ने आतापर्यंत मिळवलेले सर्वच विजय हे एकतर्फी आहेत. स्पर्धेत शेवटपर्यंत विजयाची लय न्यूझीलंड ने कायम ठेवली तर त्यांना विश्वविजेता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत