भाजी खरेदी करण्यासाठी 500 रुपयांची मोड करण्यासाठी बळजबरीने खरेदी केले लॉटरीच तिकिट, काही तासांनंतर मिळाले कोटींचे बक्षीस. वाचा सविस्तर
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याकडे गाडी असावी, बंगला असावा, परंतु आयुष्यात सर्व सुख सोयी सुविधा घेण्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. पैसा हे आजच्या युगात सर्वस्व आहे. जर माणसाकडे पैसा असेल तरच समाज त्या व्यक्तीला इज्जत देतो.

हे आपल्याला माहीतच आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर 99 टक्के कष्ट करावेच लागतात आणि 1 टक्के पाहिजे जे म्हणजे नशीब परंतु आज या लेखात अश्या व्यक्ती बद्दल सांगणार आहे ज्याने भाजी खरेदी करण्यासाठी 50प रुपयांची मोड व्हावी म्हणून लॉटरी ची तिकीट विकत घेतली आणि त्याच लॉटरी च्या तिकिट मधून करोडो रुपयांच बक्षीस मिळालं आहे.
रविवार सकाळची वेळ होती सदानंदन भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. खिश्यात 500 रुपयांची नोट होती भाजी वाल्याने सुट्टे पैसे आणण्यास सांगितले. म्हणून 500 रुपयांची मोड करण्यासाठी सदानंद यांनी लॉटरी ची तिकिट. विकत घेतली. आणि काही काळानंतर समजले की त्या तिकिटा मधून त्यांना 12 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
सदानंद हे केरळ राज्यातील कोट्टायम या छोट्याश्या गावात राहायचे. भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या सदानंद चे आयुष्य बदलुनच गेले. दरवर्षी सदानंद लॉटरी ची तिकिट खरेदी करायचा परंतु या वर्षी सदानंद ला 12 कोटी रुपयांचा इनाम मिळाला आहे.
77 वर्षीय सदानंद ने 500 सुट्टे करण्यासाठी लॉटरी चे तिकिट खरेदी केले आणि भाजी खरेदी करण्यासाठी सुट्टे पैसे घेतले. यांनी त्या पैश्याची XG 21858 या नंबर ची लॉटरी खरेदी केली. त्यामुळे काही काळातच सदानंद करोडपती झाला. सदानंदन हा एका हॉटेल मध्ये वेटर ची नोकरी करायचा आणि आपल्या कुटुंबाबरोबर लहानशा घरात राहायचं.
एका रिपोर्ट च्या नुसार सदानंद ला 12 कोटी पैकी 7.39 करोड रुपये मिळणर आहे. बाकी टॅक्स वगेरे जाणार आहे. खरेदी केलेल्या लॉटरी तिकीटाची किंमत ही 300 रुपये होती. करोडो रुपये क्षणार्धात कमवल्यामुळे सदानंदन आणि त्याचे कुटुंब अत्यंत आनंदी आणि खुश आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…