U19 World Cup 2024: पुन्हा विश्वचषक ट्रॉफी साठी अंतिम सामन्यात भिडणार भारत-ऑस्ट्रोलिया, या दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना..

U19 World Cup 2024: पुन्हा विश्वचषक ट्रॉफी साठी अंतिम सामन्यात भिडणार भारत-ऑस्ट्रोलिया, या दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना..

U19 World Cup 2024: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंडर-19 विश्वचषक 2024 (U19 World Cup 2024)  च्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील लढत निश्चित झाली आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला असून आता रविवारी म्हणजेच ११ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ  (IND vs AUS) विश्वचषक ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. म्हणजेच सीनियर एकदिवसीय विश्वचषकात ज्याप्रमाणे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अंतिम लढत होणार आहे, तेच दृश्य आता ज्युनियर विश्वचषकातही पाहायला मिळणार आहे.

शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव झाला.एकेकाळी ऑस्ट्रेलिया सामन्यात मागे पडल्याचं दिसत होतं, पण शेवटच्या षटकांमध्ये खेळ संपला होता. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 180 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात 9 गडी गमावून विजय मिळवला.

U19 World Cup 2024: पुन्हा विश्वचषक ट्रॉफी साठी अंतिम सामन्यात भिडणार भारत-ऑस्ट्रोलिया, या दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना..

U19 World Cup 2024: कसा झाला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना?

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना केवळ 179 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचे फक्त 3 खेळाडू दुहेरी आकडा पार करू शकले. उपांत्य फेरीत अझान अवेसने 52 आणि अराफत मिन्हासने 52 धावा केल्या. इतर सर्व फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, याशिवाय ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर टॉम स्टारकरने 6 विकेट घेत पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. टॉमने केवळ 9.5 षटकात केवळ 24 धावा देत 6 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य शेवटच्या षटकात ९ विकेट्स गमावून पूर्ण केले. श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात हॅरी डिक्सन आणि ऑलिव्हर पीक यांनी ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी केली. एकेकाळी ऑस्ट्रेलियन संघाने 59 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत आता अंतिम फेरीत धडक मारली आहे. सरतेशेवटी, राफे मॅकमिलनने ऑस्ट्रेलियासाठी 19 धावांची खेळी खेळली, जी सामना जिंकणारी खेळी ठरली.

 

U19 World Cup 2024: अंतिम फेरीत भारताचे पारडे जड.

टीम इंडियाने पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४९व्या षटकात हे लक्ष्य गाठले. भारताकडून कर्णधार उदय सहारनने 81 धावांची तर सचिन धसने 96 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.

U19 World Cup 2024: पुन्हा विश्वचषक ट्रॉफी साठी अंतिम सामन्यात भिडणार भारत-ऑस्ट्रोलिया, या दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना..

टीम इंडियाने एकूण नवव्यांदा आणि सलग पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ अंडर-19 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे, टीम इंडियाने हे विजेतेपद 5 वेळा जिंकले आहे. ज्याची सुरुवात 2000 मध्ये झाली होती, त्यानंतर टीम इंडियाने 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विजय मिळवला होता.

 

आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात कोणता संघ ट्रॉफी जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 5 वेळा अंडर 19  विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. आता रविवारी सहाव्यांदा ही ट्रॉफी आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने युवा टीम मैदानात उतरणार आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *