उमेश यादवने मारला कसोटीतला सर्वांत लांब षटकार, राहुल आणि विराटही पाहून झाले हैराण.. व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..
बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने एकूण 404 धावा केल्या. यादरम्यान भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा (90) आणि श्रेयस अय्यर (86) यांनी सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय रविचंद्रन अश्विननेही 113 चेंडूत 58 धावांची खेळी करत टीम इंडियाला 400 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

याशिवाय उमेश यादवनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेत डावाच्या अखेरीस दोन षटकार खेचून नाबाद १५ धावा केल्या.
उमेश यादवने मारलेल्या या दोन षटकारांपैकी एक षटकार इतका लांब होता की चेंडू 100 मीटर अंतरावर पडला. उमेश यादवने मारलेल्या या षटकारात तुम्ही त्याची ताकद पाहू शकता आणि हा 100 मीटर लांब षटकार सध्याच्या सामन्यातील सर्वात लांब षटकार आहे. या षटकार चा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते उमेश यादवचे कौतुकही करत आहेत.
दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाला उमेश यादवच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीकडून जास्त अपेक्षा आहेत. फलंदाजांनंतर आता बांगलादेशचा डाव लवकरात लवकर गुंडाळून टीम इंडियाची सामन्यावरील पकड मजबूत करणे हे भारतीय गोलंदाजांवर अवलंबून असेल.
भारतीय संघासाठी केवळ ही कसोटीच नाही तर त्यानंतर येणारा कसोटी सामनाही खूप महत्त्वाचा आहे कारण भारताने एकही सामना गमावला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी खेळण्याचे स्वप्न अर्धवट राहू शकते.
— Bleh (@rishabh2209420) December 15, 2022
अशा परिस्थितीत राहुल अँड कंपनी प्रथम चटगाव कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर पुढील सामन्यात रोहित शर्माही संघात पुनरागमन करेल अशी आशा आहे. तिसर्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले पण जेव्हा भारताला शेवटच्या षटकांमध्ये त्याची गरज होती तेव्हा त्याने धैर्याने फलंदाजी केली आणि भारताचा सामना जवळपास जिंकला.
रोहित सध्या बांगलादेशातून मुंबईत पोहोचला असून येथील तज्ञ डॉक्टरांनी पाहिल्यानंतरच तो दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेशला परतायचा की नाही याचा निर्णय घेईल. तोपर्यंत कर्णधार पदाची जबाबदारी सलामीवीर लोकेश राहुल सांभाळत आहे.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारत मजबूत स्थितीत..
प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाने सर्वबाद 404 धावापर्यंत मजल मारली. प्रत्युतरात मात्र बांग्लादेशचा संघ चांगलाच मागे राहिला असून त्यांच्या केवळ 133 धावा धावफलकावर लागल्या आहेत. यादरम्यान त्यांनी 8 गडी सुद्धा गमावले आहेत. एकूण परिस्थिती पाहता भारताकडे ही कसोटी जिंकण्याची चांगली संधी आहे. कारण भारत अजूनही 271 धावांनी समोर आहे.
हेही वाचा: