IND vs SL LIVE: उमराण मलिकने टाकला एवढा जबरदस्त चेंडू की फलंदाजीस उभा असलेल्या हसरंगाला काही कळायच्या आतच स्टंप उडून लांब पडला, व्हिडीओ होतोय जबदरस्त व्हायरल..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी -20 सध्या पुण्यामध्ये खेळवला जातं आहे.प्रथम फलंदाजी करतांना श्रीलंकेच्या सलामीविरानी जबरदस्त फलंदाजी करत पहिल्या 8 षटकात 80+ धावा काढल्या. श्रीलंकेची सलामीवीर जोडी जबरदस्त लयीत दिसत होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजानी पुन्हा कमबॅक केले.
यादरम्यान आता भारतीय संघाचा तेज गोलंदाज उमरान मलिकच्या गोलंदाजीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. उमरान मलिकने भारतीय संघांसाठी 15वे षटक टाकले ज्यातील हा व्हिडीओ आहे.
तर झालं असं होत की, भारतीय संघाकडून 15वे षटक टाकण्यास गोलंदाज उमरान मल्लिक आला होता. 15 व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर उमराण मलिकने असलंकाला शुभमन गिलकडून झेलबाद केले. त्यांतर पुढच्याच चेंडूवर फलंदाजीस आलेला हसरंगा सुद्धा बोल्ड झाला. उमराण मलिकने टाकलेला हा चेंडू थेट लेफ्ट स्टंपवर जाऊन लागला आणि स्टंप उघडून पडला.

त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय गोलंदाजांनी केले कमबॅक
सुरवातीपासूनच श्रीलंकेचे फलंदाज जबरदस्त लयमध्ये दिसत होती. दोन्ही सलामीवीरांनी जबरदस्त फलंदाजीचा नजारा दाखवत 10 च्या रणरेटने धावा काढल्या, त्यांतर मात्र भारतीय गोलंदाजांनी पुरागमन करत मधल्या शतकांत विकेट मिळवले. भारताकडून अक्षर पटेलने 2 उमराण मलिकने 3 तर युजी चहलने एक गडी बाद केले.
Umran spitting fire 2 in 2 💥
Jammu Express on the run #INDvSL #UmranMalikpic.twitter.com/yt2GfCHpTk
— Asim Riaz Trends™ (@asim_trend) January 5, 2023
भारतीय संघापुढे विजयासाठी 207 धावांचे लक्ष
श्रीलंकेच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत भारतीय संघाकडून तब्बल 207 धावांचे डोंगराएवढे लक्ष ठेवले आहे. दसून सनका ने जबरदस्त स्फोटक खेळी खेळत केवळ 22 चेंडूत 56 धावांची खेळी खेळली. यामुळेच भारतीय संघाच्या गोलंदाजाना जबरदस्त मार बसला. आनि भारतापुढे 207 धावांचे लक्ष उभे राहिले. आता भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.