शानदार.. जबरदस्त .. जिंदाबाद.. उमराण मलिकच्या योर्करपुढे महेश तिक्षणा चारी मुंड्या चीत, स्टंप उडून लांब जाऊन पडला,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
शनिवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवत सामन्यासह मालिका सुद्धा आपल्या नावावर केली. या सामन्याचे हिरो ठरले ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि उमराण मलिक. सूर्याने या सामन्यात शानदार शतक झळकावले.
सामन्यात एकीकडे सूर्यकुमार यादवची तुफान खेळी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे वेगवान उमरान मलिकनेही आपल्या खतरनाक गोलंदाजीने सर्वांना थक्क केले. उमरानने या सामन्यात 3 षटकात 31 धावा देत 2 बळी घेतले

उमरानने वानिंदू हसरंगा याला 9 धावांवर आणि महिष तिक्षणा 2 धावांवर बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. उमरानने आपल्या तुफानी चेंडूवर तिक्षणाला अशा प्रकारे गोलंदाजी केली की क्रिकेटप्रेमी दंग झाले. उमराण मलिकच्या गोलंदाजीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे प्रकरण भारत गोलंदाजी करतांना 16व्या षटकात घडले. श्रीलंकेच्या 7 विकेट 123 धावांत पडल्या होत्या. अशा स्थितीत उमरानने या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संघर्ष करणाऱ्या श्रीलंकेला मोठा धक्का दिला. उमरानने गोलंदाजी करताच, चेंडू आदळल्यानंतर हा चेंडू इतका धोकादायक झाला की, टेकशाने बॅट स्विंग करताच चेंडू स्टंपच्या बाहेर उडून बाहेर आला.
उमरानच्या या चेंडूने स्टंप उडाला आणि हवेत गुलाटी खावून लांब जाऊन पडला. उमराणच्या या गोलंदाजीमुळे सर्वच क्रिकेट चाहते खुश झाले. त्याने तिक्षणाला बाद करताच मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय.
उमरानने या मालिकेत 7 विकेट घेतल्या.
Umran Malik cartwheeling stumps is itself a sight to see 🤗👏#INDvSL #UmranMalik #TeamIndia#SuryaKumarYadav pic.twitter.com/04xUiMB2Pt
— Vinod Kumar (@vikram_kn1) January 7, 2023
उमरानने या मालिकेतील तीन सामन्यात 7 विकेट घेत जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंगही खूप प्रभावी ठरला. त्याने 2.4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. कर्णधार हार्दिक पांड्याने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. त्याचबरोबर युझवेंद्र चहलने 3 षटकांत 30 धावा देत 2 बळी घेतले. भारतीय संघाच्या 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारताने हा सामना 91 धावांनी जिंकला. टीम इंडिया आता 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेची तयारी सुरू करणार आहे. जिथे रोहित शर्मा कर्णधार असेल.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: