Unbreakable Records In Cricket: क्रिकेटमधील हे 10 विक्रम मोडणे जवळपास अशक्यच; यादीमध्ये सचिनचे विक्रम सर्वाधिक

0

Unbreakable Records In Cricket: t20 क्रिकेट सुरू होण्याच्या अगोदर वनडे क्रिकेट  प्रचंड लोकप्रिय होते. भारतात क्रिकेटचा खूप मोठा असा इतिहास आहे. अनेक दिग्गज खेळाडू आणि त्यांनी केलेले मोठमोठे विक्रम या क्रिकेटमध्ये आपणास पाहायला मिळाले आहेत. आज आपण या विशेष लेखाच्या माध्यमातून क्रिकेटमधील 10 असे विक्रम पाहणार आहोत जे मोडणे जवळपास अशक्य आहे. चला तर जाणून घेऊया कोनते आहेत ते विक्रम आणि कोणत्या खेळाडूंच्या नावावर आहेत.

Unbreakable Records In Cricket: क्रिकेटमधील हे 10 विक्रम मोडणे आहे अशक्य..

 

१. भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 62 सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ होण्याचा पुरस्कार जिंकला आहे. त्याच्या इतके पुरस्कार इतर कोणत्याच खेळाडूला जिंकता आले नाहीत. हा जागतिक विक्रम मोडण्यासाठी सचिन सारखे दीर्घकाळ वन डे क्रिकेट खेळावे लागेल, जे सध्या संघातील वाढती स्पर्धा पाहता कोणत्या खेळाडूला एवढी संधी मिळेल असे वाटत नाही

Unbreakable Records In Cricket: क्रिकेटमधील हे 10 विक्रम मोडणे जवळपास अशक्यच; यादीमध्ये सचिनचे विक्रम सर्वाधिक

२. श्रीलंकेचा स्टार माजी फिरकीपटू मुथ्थय्या मुरलीधरन यांनी 534 वनडे विकेट घेतले आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्याने 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मुरली यांना पाच विश्वचषक खेळण्याचा अनुभव होता. 

३.पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल-हक यांनी वन डे क्रिकेटमध्ये शतक न ठेवता 5,122 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारे ते जगातले एकमेव फलंदाज आहेत.

४.या यादीमध्ये 4 क्रमांकावर पुन्हा सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिन तेंडुलकर यांनी वन-डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2016 चौकार ठोकले आहेत. म्हणजे जवळपास आठ हजार 64 धावा त्यांनी चौकार ठोकून काढले आहेत.

५. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत पाच वेळा आयसीसीचा वनडे विश्वचषक जिंकला आहे. यामध्ये त्यांनी 78 सामने जिंकले आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे.

६.ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने कर्णधार म्हणून खेळताना 230 वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहेत. विजयाची सरासरी देखील त्याचे सर्वोत्तम आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला 2003 आणि 2007 मध्ये वनडे विश्वचषक जिंकून दिला होता.

७.सलग ९८ सामन्यांमध्ये 3.09 चे इकॉनोमिक रन रेट ठेवून गोलंदाजी करणारे जोएल गार्नर यांचा विक्रम देखील आबादित आहे. 80 च्या दशकातील ते एक सर्वोत्तम गोलंदाज होते.

Unbreakable Records In Cricket: क्रिकेटमधील हे 10 विक्रम मोडणे जवळपास अशक्यच; यादीमध्ये सचिनचे विक्रम सर्वाधिक

८.सचिन तेंडुलकर यांनी आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. त्यानंतर ते सलामीला येऊन खेळू लागले. सलामीला खेळताना त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये 15,310 धावा केल्या आहेत. जे की आत्तापर्यंत कोणत्या सलामीच्या फलंदाजाला इतक्या धावा करता आल्या नाहीत.

९.श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास यांनी 19 धावा देत आठ गडी बाद केले आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध 2003 साली विश्वचषक स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली होती.

१०.भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याने कोलकत्याच्या मैदानात श्रीलंके विरुद्ध खेळताना 264 धावांची नाबाद ऐतिहासिक खेळी केली होती.

तर मित्रांनो, हे होते ते 10 विक्रम जे मोडण्यासाठी सध्याच्या खेळाडूंसाठी खरच अवघड असेल. यांपैकी एकही विक्रम मोडणे ही साधी गोष्ट नाहीये. पाहूया येणाऱ्या काळात कोणता युवा खेळाडू हे विक्रम मोडू शकतो का..


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.