Under 19 World cup 2024: आयर्लंडने रचला इतिहास, अखेर तगड्या न्यूझीलंडला केले पराभूत, हा खेळाडू ठरला सामन्याचा हिरो..

Under 19 World cup 2024: आयर्लंडने रचला इतिहास, अखेर तगड्या न्यूझीलंडला केले पराभूत, हा खेळाडू ठरला सामन्याचा हिरो..

Under 19 World cup 2024 : अंडर-19 विश्वचषक 2024 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. तर आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून न्यूझीलंडचा ४१ धावांनी पराभव केला. आयर्लंडचा हा न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील पहिला विजय आहे. या सामन्यापूर्वी, आयर्लंडच्या पुरुष आणि महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि T20 या कोणत्याही प्रकारात विजय मिळवला नव्हता. मात्र युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीने आयर्लंडला न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.

Under 19 World cup 2024: आयर्लंडने रचला इतिहास, अखेर तगड्या न्यूझीलंडला केले पराभूत, हा खेळाडू ठरला सामन्याचा हिरो..

Under 19 World cup 2024, IRE vs NZ : या खेळाडूने केल्या सर्वाधिक धावा!

आयर्लंडचा कर्णधार फिलिप्स ले रॉक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. या सामन्यात आयरिश संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 267 धावा केल्या. संघाकडून गॅविन रोल्स्टनने सर्वाधिक 82 धावा केल्या. तर कियान हिल्टनने ७२ धावांचे योगदान दिले. सलामीवीर रायन हंटरने 24 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच आयरिश संघाला 267 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. कियान हिल्टनला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

 

Under 19 World cup 2024, IRE vs NZ: न्यूझीलंडची खराब सुरुवात .

Under 19 World cup 2024: आयर्लंडने रचला इतिहास, अखेर तगड्या न्यूझीलंडला केले पराभूत, हा खेळाडू ठरला सामन्याचा हिरो..

यानंतर २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. जेव्हा सलामीवीर ल्यूक वॉटसन अवघ्या 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जेम्स नेल्सनने 34, रॉबी फॉल्क्सने 25 धावा केल्या. लचलान स्टॅकपोल 33 धावा करून नाबाद राहिला. 32.1 षटकांनंतर न्यूझीलंड संघाने 5 विकेट गमावून 131 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर खराब हवामानामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. यानंतर आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून ४१ धावांनी विजय मिळवला.

आयर्लंडचा कर्णधार फिलिप्स ले रौक्सने या स्पर्धेतील शानदार समाप्तीबद्दल आनंद व्यक्त केला. या विजयामुळे आम्ही आनंदी आहोत, असे तो म्हणाला.   कियान हिल्टन आणि गॅव्हिन रोल्स्टन यांच्यातील भागीदारी महत्त्वपूर्ण होती, आमच्यासाठी खेळ तयार केला. मला वाटत नाही की शेवटी आम्हाला हवा होता तितका फायदा आम्ही घेतला. गोलंदाजांनी सुरुवातीलाच दडपण निर्माण केले. पावसामुळे थोडासा प्रतिकूल परिणाम झाला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *