भारताचे हे तीन स्टार खेळाडू 2006 च्या अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मासोबत खेळले होते, त्यांची नावे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

गेल्या काही दिवसांचा काळ हा अत्यंत वेगळा होता, तेव्हा जे खेळाडू अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करतील अश्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळण्याची संधी मिळत होती. परंतु आता आपल्याकडे आयपीएल मध्ये खेळाडूचा परफॉर्मन्स पाहून भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी दिली जाते.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी 2006 साली अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा बरोबर फलंदाजी केली होती जाणून घेऊया कोण आहेत ते स्टार फलंदाज.
रविंद्र जडेजा :-
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. रवींद्र जडेजाने 2006 मध्ये रोहित शर्मा बरोबर अंडर-19 वर्ल्ड कप खेळला होता. या वर्ल्ड कप सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या आणि 34 धावा ठोकल्या होत्या.
चेतेश्वर पुजारा:-
चेतेश्वर पुजारा ची तुलना ही भारतीय संघाचे माजी फलंदाज राहुल द्रविड या सोबत केली जाते. चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघाचा अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो.
चेतेश्वर पुजारा 2006 च्या अंडर-19 विश्वचषकात रोहित शर्मासोबत खेळला होता आणि वर्ल्ड कप मध्ये त्याने सहा सामन्यात 349 धावा केल्या होत्या.
पियुष चावला:-
भारताचा सुप्रसिद्ध स्टार क्रिकेटर पियुष चावला 2006 मध्ये रोहित शर्मासोबत अंडर-19 विश्वचषक सामना खेळायला होता. परंतु अत्यंत कमी लोकांना याची माहिती असेल आणि पियुष चावलाने 6 सामन्यात 13 विकेट घेतल्या.