नशीब आजमावले मात्र कमनशिबी निघाले, काही वय झालेले तर काही युवा खेळाडू, आयपीएल 2023 च्या मिनीलिलावात या 20 खेळाडूंना नाही मिळाला खरेदीदार, यादीत स्टार खेळाडूंचाही समावेश..
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामासाठी लिलाव कोचीमध्ये सुरू आहे. आयपीएल 2023 मध्ये मिनी लिलाव होत असले तरी त्याचा थरार मेगा लिलावापेक्षा अधिक आहे. आयपीएल 2023 च्या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब पालटले. त्याच वेळी, असे अनेक खेळाडू होते ज्यांना पहिल्या फेरीत एकही खरेदीदार मिळाला नाही.
पहिल्या फेरीत न विकलेले खेळाडू
- जो रूट, मूळ किंमत 1 कोटी
- Rilee Rossouw, मूळ किंमत 2 कोटी
- शाकिब अल हसन, मूळ किंमत 1.50 कोटी
- लिटन दास, मूळ किंमत ५० लाख
- कुसल मेंडिस, मूळ किंमत ५० लाख
- टॉम बॅंटन, मूळ किंमत 2 कोटी
- ख्रिस जॉर्डन, मूळ किंमत 2 कोटी
- अॅडम मिलने, मूळ किंमत 2 कोटी
- अकील हुसेन, मूळ किंमत एक कोटी
- तबरेझ शम्सी, मूळ किंमत एक कोटी
- मुजीब उर रहमान, मूळ किंमत एक कोटी
- अनमोलप्रीत सिंग, मूळ किंमत २० लाख
- शुभम खजुरिया 20 लाख
- प्रियम गर्ग 20 लाख
- अभिमन्यू ईश्वरन 20 लाख
- दिनेश बाणा 20 लाख
- केएम आसिफ 30 लाख
- लान्स मॉरिस 30 लाख
- मुरुगन अश्विन 20 लाख
- श्रेयस गोपाळ 20 लाख

या खेळाडूंना पहिल्या फेरीत एकही खरेदीदार सापडला नसला तरीही त्यांना संधी आहे. वास्तविक, दुसऱ्या फेरीतही या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अशा स्थितीत यातील अनेक खेळाडू दुसऱ्या फेरीत विकले जाऊ शकतात.
आयपीएल 2023 च्या लिलावात इंग्लिश खेळाडूंचे वर्चस्व होते. फ्रँचायझींनी इंग्लंडच्या खेळाडूंवर खूप पैसा खर्च केला आणि त्यांना आपल्या संघात घेण्यासाठी सर्व रेकॉर्ड तोडले. इंग्लंडच्या फक्त तीन खेळाडूंना 48 कोटी रुपये मिळाले. हा मिनी लिलाव असला तरी त्यात इंग्लिश खेळाडूंनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
सेम करन हा लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला
सेम करन ला विकत घेण्यासाठी त्याच्या दोन जुन्या संघ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये दीर्घ लढाई झाली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासह करन हा या लीगमध्ये सर्वाधिक जास्त बोली लागून विकला जाणारा खेळाडूही ठरला आहे. पंजाब किंग्जने त्याला तब्बल 18.50 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले आहे.
स्टोक्स धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार..
चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. बेन स्टोक्सची आयपीएलमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. यापूर्वी 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. एकेकाळी तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता.