प्रत्येकाचे स्वप्न असते की मोठे अधिकारी व्हावे. भारतील सर्वात मोठी पोस्ट ही कलेक्टर आहे ती पोस्ट मिळवण्यासाठी UPSC ही एक कठीण स्वरूपाची परीक्षा द्यावी लागते. UPSC परीक्षा ही सहजासहजी पास होऊ शकत नाही कित्येक लोकांचे यामध्ये आयुष्य निघून जाते. तरी सुद्धा ही परीक्षा पास होत नाही.

तर मित्रांनो आज आम्ही लेखात अश्या मुलाबद्दल सांगणार आहे. ज्याने ही कठीण परीक्षा वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पास करून कुटुंबाचे आणि गावाचे नाव उंचावले. गावातील सर्व लोकांना या छोट्याश्या मुलाचा अभिमान वाटत आहे.
बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील छोट्याश्या गावात राहणाऱ्या मुकुंद कुमार ने अवघ्या वयाच्या 22 व्या वर्षी UPSC ही कठीण स्वरूपाची परिक्षा पास केली. एवढ्या लहान वयात एवढी अवघड परीक्षा पास करणे खरंच खूप अवघड आहे. भल्या भल्यांना जे जमत नाही ते एवढ्याश्या लहान मुलाने करून दाखवले आहे.
मुकुंद कुमार ने 2019 मध्ये UPSC ची पहिली परीक्षा दिली होती. त्यावेळी मुकुंद चे वय हे अवघे 22 वर्षे होते. पहिल्याच प्रयत्नात मुकेश ने UPSC ची परीक्षा पास केली. आणि UPSC मध्ये ऑल इंडिया 54 वा रँक मिळवला. सामान्य कुटुंबातून आलेल्या या मुकुंद ने एवढ्या कमी वयात ही प्रगती केली खरंच अभिमानास्पद आहे. तसेच मुकुंद चे वडील हे टेलिफोन ऑफिस चालवतात आणि आई घरकाम करते.
सामान्य कुटुंब असलेल्यामुळे मुकुंद कुमार ची आर्थिक स्थिती कुमकवत होती. परंतु मुकुंद कुमार च्या वडिलांनी त्याच्या अभ्यासात कोणतीही बाधा येऊ नये म्हणून आपली असलेली जमीन विकून मुकुंद ला पैसे दिले.
अभ्यासाचे सातत्य आणि नियोजन यामुळे मुकुंद ने सर्व काही अडचणी अगदी सहजपणे पार केल्या. 12 वी पर्यंत सैनिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर तिथून पुढे दिल्ली मध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला. आणि दिल्ली मधून इंग्रजी साहित्य मध्ये पदवी घेऊन UPSC ची तयारी करू लागला.
तसेच UPSC आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आणि सल्ले सुद्धा दिले आहेत. त्याने सांगितले की कोणतेही पुस्तकं वाचायच्या आधी त्याचा सिल्याबस समजून घेणे गरजेचे आहे. तसेच अभ्यास पूर्ण झाल्यावर मागील वर्षीची प्रश्न पत्रिका बघणे खूप गरजेचे आहे. तसेच मागील प्रश्न पत्रिकेत आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधावी.