यावर्षी झालेल्या ऑलिम्पिक मध्ये आपल्या भारतासाठी अतिशय निराशाजनक ठरलेली गोष्ट म्हणजे सुवर्ण पदक मिळण्याआधीच विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर पडली.तिने जोरदार सामना खेळून फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता.पण जास्त वजनामुळे ती ऑलिम्पिक मधून बाहेर पडली. विनेश फोगाट ही कुस्ती बरोबर खेळाच्या मैदानातही तेवढ्याच उंच शिखरावर आहे.तिने तिच्या करिअर मध्ये खूप गोष्टी संपादन केल्या आहेत.
कॉमनवेल्थ आणि एशियन मध्ये गोल्ड मेडल जिंकणारी ती भारताची पहिली महिला रेसलर आहे.-
अनेक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये अनेक पदक जिंकणारी विनेश फोगट ही भारतातील एकमेव कुस्तीपटू आहे.अवघे 29 वय वर्षे असताना तिची संपत्ती ही 36.5 कोटी रुपये आहे. तिला कुस्तीशिवाय मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स एंड स्पोर्टसकडूनही तिला सॅलरी मिळते.
हे ही वाचा:- सर्वाधिक पगार असलेले टॉप 5 क्रिकेट प्रशिक्षक, रवी शास्त्री आणि मिसबाह उल हक यांचाही या यादीत समावेश आहे.
विनेश फोगट याना मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स एंड स्पोर्टसकडून विनेशला 50000 रुपये वेतन मिळते.यामुळे वर्षाची सॅलरी 6 लाख रुपये होते. त्याशिवाय विनेश फोगट बेसलाईन व्हेंचर आणि कॉर्नरस्टोन स्पोर्ट्सची ब्रँड आंबेसिटर आहे.
विनेश फोगट ही हरियानामध्ये एका शानदार विला आहे तिथे राहते आणि ती हरियानामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते.
विनेश फोगट हिच्याकडे शानदार विला सोबतच एकापेक्षा एक भारी आणि महागड्या स्पोर्ट्स कार सुद्धा आहेत. तिच्याकडे तीन लक्जरी कार आहेत,या मध्ये टोयोटा कंपनीची फॉरचूनर नावाची गाडी आहे त्याची किंमत 35 लाख रुपये आहे.
त्यासोबतच तिच्याकडे इंनोव्हा कार सुद्धा आहे त्याची किंमत सुमारे 28 लाख रुपये आहे. त्याशिवाय त्याच्याकडे मर्सिडीज GLE सुद्धा गाडी आहे. ज्याची किंमत सुमारे 1.8 कोटी रुपये आहे. ही सर्व संपत्ती आणि आरामदायी जीवनशैली हे त्याच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे.
हे ही वाचा:- क्रिकेट सोबतच हे 4 खेळाडू करत आहेत सरकारी नोकरी, जाणून घ्या कोण कोणत्या पोस्ट वर कार्यरत आहे.