Vinesh Phogat Records: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने फायनल सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर नाराज होऊन निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने आपल्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवृत्तीच्या एक दिवस आधी विनेश फोगटचे वजन निर्धारित किलोपेक्षा जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले होते. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने निवृत्तीची घोषणा केली आहे. विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले नसेल, पण तिने तिच्या कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले आहेत.
Vinesh Phogat is already a sporting legend, now she can be a wrestling great – ESPN https://t.co/uSS4uyqSqi
— Jordan Burroughs (@alliseeisgold) August 6, 2024
विनेश फोगटच्या नावावर आहेत हे मोठे विक्रम.. (Vinesh Phogat Records)
विनेश फोगटने कुस्तीतून अचानक निवृत्ती जाहीर केली असली तरीही तिच्या नावावर असा विक्रम आहे, जो कोणत्याही महिलेसाठी सोपा नसेल. विनेशने सलग तीन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. सलग तीन ऑलिम्पिक खेळणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. (First women player who played in 3 Olympics game)
विनेश रिओ, टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकचा भाग आहे. तिला कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेले नसले तरीदेखील ती भारताची सर्वांत चांगली कुस्तीपटू आहे.. रिओ ऑलिम्पिकदरम्यान तिला दुखापत झाली होती, त्यामुळे तिला अंतिम सामना अर्ध्यात सोडावा लागला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत तिला पराभवाचा सामनाकरावा लागला. तर काल पॅरिसमध्ये ती फायनलमधून अपात्र ठरली त्यांनतर लगेचच तिने निवृत्ती जाहीर केली.
One of the blackest day in Indian Sports History as #VineshPhogat announced #Retirement 💔💔
National Hero lost Vultures won pic.twitter.com/q60TVDZ9wk
— Ankit Mayank (@mr_mayank) August 8, 2024
विनेश फोगटची अशी आहे कारकिर्द (Vinesh Phogat Career)
विनेशला ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक मिळाले नसले तरी, तिने आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 2014, 2018 आणि 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पदके जिंकली होती. 2018 मध्ये ती आशियाई चॅम्पियन बनली. तीने 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन वेळा 2 कांस्यपदके जिंकली आहेत. 2019 आणि 2022 मध्येही तिने पदके जिंकली होती. तिने 2013 मध्ये युथ रेसलिंग चॅम्पियनशिपने आपल्या करिअरची सुरुवात केली. पहिल्याच स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकून आपल्या कारकिर्दीला धडाक्यात सुरवात केली होती.
आता मात्र या अंतिम सामन्याआधी अपात्र ठरल्यामुळे तिने निवृत्ती जाहीर केली आहे..
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?