कालच्या सामन्यात विराट कोहली ने मोडले रोहित शर्मा चे हे रेकॉर्ड, आयपीएल च्या इतिहासात विराट ने कोरले नाव
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मधील अनुभवी व हुशार बॅट्समन जे की जगात त्यांची ओळख असणारे विराट कोहली यांनी कल रात्री झालेल्या मॅच मध्ये मुंबई इंडियन चे कर्णधार रोहित शर्मा यांचे मोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. आयपीएल मध्ये सर्वात जास्त वेगाने अर्धशतक बनवणारा खेळाडू म्हणून विराट कोहली ची आता ओळख निर्माण झालेली आहे. विराट कोहली ने रविवारी जी बंगलोर मध्ये चिन्हस्वामी स्टेडियम मध्ये आयपीएल ची मुंबई इंडियन विरोधात मॅच झाली त्या मॅचमध्ये आपली जोरदार खेळी दाखवली जे की २०२३ मध्ये रॉयल बंगलोर ने अगदी धडाक्यात सुरुवात केल्याचे दिसत आहे.

आयपीएल च्या इतिहासात विराट चे नाव :-
आयपीएल च्या आतापर्यंत च्या इतिहासात विराट कोहली ची हे २३ वि वेळ आहे जे की अगदी अत्यंत वेगाने म्हणजेच १५० च्या वर strike रेट ठेवून आपले अर्धशतक पूर्ण केले. जो की हा रेकॉर्ड मुंबई इंडियन चे कर्णधार तसेच अनुभवी खेळाडू रोहित शर्मा यांच्या नावे होता ज्यांनी आतापर्यंत २२ वेळा १५० च्या वर strike रेट ठेवून अर्धशतक पूर्ण केले आहे. या अर्धशतक पूर्ण करणाऱ्या लिस्ट मध्ये तिसरे नाव येते ते म्हणजे चेन्नई सुपर किंग संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी यांनी आतापर्यंत १९ वेळा सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले आहे तर चौथ्या स्थानावर नाव येते ते म्हणजे सुरेश रैना. सुरेश रैना ने सुद्धा आतापर्यंत १९ वेळा अगदी जलदगतीने अर्धशतक पूर्ण केले आहे.
विराट कोहली विरुद्ध मुंबई इंडियन :-
रविवारी रात्री जी बंगलोर मध्ये चिन्हस्वामी स्टेडियम मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन ची पहिली मॅच झाली त्या मॅच मध्ये विराट कोहली ने मुंबई इंडियन विरोधात ४९ बॉल मध्ये ८२ रन्स ठोकल्या. ज्यामध्ये ६ चौके आणि ५ सिक्स असे मारले गेले. जे की या दरम्यान विराट कोहली चा strike रेट हा १६७ होता. मुंबई इंडियन ला या मॅच मध्ये पराभूत सहन करावा लागला जे की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे ८ विकेट्स राखून मॅच जिंकले आहे.
पहिली मॅच देवाला :-
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुंबई इंडियन आयपीएल मध्ये पहिली मॅच हरलेली आहे त्यामुळे सोशल मीडियावर सध्या हेच चालू आहे की पुन्हा एकदा कप मुंबई च्या हातात दिसू शकतो. मात्र काल झालेल्या मॅच मूळे असे निदर्शनास येत आहे की यंदा च्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोठ्या जिद्दीने आणि तुफानीने आयपीएल च्या मैदानात उतरले आहे.