VIRAL VIDEO: ‘हा तर सुपरमॅनचा पण बाप निघाला” बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रोलियाच्या या खेळाडूने घेतला हवेत झेल,व्हिडीओ पाहून सर्व जगातील क्रिकेट चाहते करताहेत कौतुक, व्हिडीओ होतोय भलताच व्हायरल.
क्रीडा विश्वात कधी कोणता खेळाडू चमकेल याची काहीही गेरंटी नसते . काही खेळाडू आपल्या कौशल्याने अनेक वेळा प्रेक्षकांना आकर्षित करत असतात. असाच काहीसं घडलंय ते सिडनी येथे सुरु असलेल्या ‘बिग बॅश लीगमध्ये’. बिग बॅशच्या एका सामन्यात आज ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना आपल्या जबरदस्त फिल्डिंगने वेड लावलंय.
ऑस्ट्रेलियन खेळाडू बेन कटिंगने बिग बॅश लीगमध्ये आज एक असा झेल पकडला आहे, ज्यानंतर त्याची तुलना ‘सुपरमॅन’शी केली जात आहे. बेन कटिंगने सीमारेषेवर हवेत उडी मारून हा झेल टिपला आणि या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

बिग बॅश लीगमध्ये रविवारी सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर्सने सिडनी सिक्सर्ससमोर विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य ठेवले होते, लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जेम्स विन्सने थर्ड मॅनच्या दिशेने हवेत शॉट खेळला, पण बेनने बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण केले. तो धावताना चेंडूपर्यंत पोहोचला आणि ‘सुपरमॅन’प्रमाणे हवेत उडत झेल पकडला. बेन कटिंगच्या या झेलचे कौतुक होत आहे.
त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. जगभरातील अनेक क्रिकेट चाहते त्याच्या या झेलाचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे स्वतः विरोधी संघातील कर्णधाराने सुद्धा सामना संपल्यानंतर बेन कटिंगची स्तुती केलीय.
मात्र, या अप्रतिम झेलनंतरही सिडनी थंडर्सला पराभवाला सामोरे जावे लागले, एम. हेन्रिक्स आणि जॉर्डन सिल्क यांच्या खेळीच्या जोरावर सिडनी सिक्सर्सने सात विकेट्स राखून सामना जिंकला.
बिग बॅश लीगमध्ये बेन कटिंगने घेतला सुपरमेन झेल, पहा व्हायरल व्हिडीओ..
🚁BEN CUTTING!
And late cameo of 26*(15).
— Cricket Addicts (@Cricket69Addict) January 8, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: