केएल राहुल: लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने शुक्रवारी लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकीकडे केएलने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तर दुसरीकडे त्याने सीएसकेच्या चाहत्यांची मनेही जिंकली. सामना संपल्यानंतर केएल राहुलने एमएस धोनीचा विशेष आदर केला.
केएल राहुलने धोनीच्या सन्मानार्थ कॅप काढली..
त्याचे असे झाले की, सामना संपल्यानंतर केएल राहुल सीएसकेच्या खेळाडूंना भेटायला आला. त्यांच्यासमोर कॅप्टन रुतुराज गायकवाड आधी आले. यानंतर एमएस धोनी येताच त्याने त्याच्या सन्मानार्थ आपली टोपी काढली. केएलने अशाप्रकारे वरिष्ठ खेळाडूचा आदर केल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. त्याचा हा हावभाव क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
याआधी समीर रिझवीने देखील अश्याच पद्धतीने मने जिंकली आहेत..
याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात युवा खेळाडू समीर रिझवीनेही विराट कोहलीला असाच आदर दिला होता. विराट कोहलीशी हस्तांदोलन करण्यापूर्वी समीरने त्याच्या सन्मानार्थ त्याची कॅप काढली. या दोन्ही घटनांनी या सज्जन खेळाबद्दलचा आदर वाढला आहे.
KL Rahul removed the cap before shaking the hand with MS Dhoni. ⭐
– A nice gesture by KL. pic.twitter.com/Uc7PuTi4y1
— Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2024
CSK vs LSG: केएल राहुलच्या संघाचा शानदार विजय.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात एलएसजीने शानदार फलंदाजी केली आणि 8 विकेट्सने शानदार विजय नोंदवला. केएल राहुलच्या शानदार 82 धावाशिवाय क्विंटन डी कॉकने 54, निकोलस पूरनने नाबाद 23 आणि मार्कस स्टॉइनिसने नाबाद 8 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर एलएसजी संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. तर CSK संघ ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.