राहुल त्रिपाटी: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा पहिला क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान हैदराबादचा स्टार फलंदाज राहुल त्रिपाठी धावबाद झाला आणि त्यानंतर त्याचे हृदयद्रावक चित्र समोर आले आहे.
या सामन्यात SRH ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर ते कोलकात्याच्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले. मात्र, दुसरीकडे त्रिपाठी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि आपल्या संघासाठी एक टोक सांभाळत होता.
या सामन्यात त्रिपाठीने 35 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. तथापि, त्याचा डाव रनआऊटमध्ये संपला आणि त्यानंतर तो खूपच तुटलेला दिसत होता कारण त्याच्या बाद झाल्यानंतर संघाची स्थिती वाईट होती आणि मोठी धावसंख्या करता आली नाही.
राहुल त्रिपाठीचा इमोशनल व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
हैदराबादच्या डावाचे 14 वे षटक सुरू होते आणि कोलकाताकडून स्टार फिरकीपटू सुनील नरेन गोलंदाजी करण्यासाठी आला. षटकाच्या पहिल्या चेंडूवर युवा फलंदाज अब्दुल समद स्ट्राईकवर उपस्थित होता आणि त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या प्रयत्नात समदने त्रिपाठीला बाद केले. अब्दुल समदच्या चुकीमुळेच राहुल धावबाद झाला आणि त्यानंतर तो तुटलेला दिसला. आऊट झाल्यानंतर त्रिपाठी निराश होऊन ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवर हताश होऊन बसलेला दिसला ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होतोय.
राहुल पायऱ्यांवर डोकं खाली करून बसला होता आणि एकदम निराश दिसत होता. त्याच्या बाद झाल्याचा परिणाम म्हणजे हैदराबादचा डाव पूर्णपणे विस्कळीत झाला आणि क्वालिफायरसारख्या मोठ्या सामन्यात ते १५९ धावांत सर्वबाद झाले. या सामन्यात कोलकाताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत विरोधी संघाला बॅकफूटवर ढकलले. गोलंदाजीदरम्यान त्याने 3 बळी घेतले, तर सलामीवीर ट्रॅव्हिस हेड शून्यावर बाद झाला.
MOST HEARTBREAKING PICTURE OF THE DAY. 💔
– Rahul Tripathi sitting in tears on the stairs. He’s absolutely devastated. You gave your best, Tripathi! ❤️ pic.twitter.com/bV1nhkzcjs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2024
IPL 2024: केकेआरची अंतिम सामन्यात धडक.
SRH चा पराभव करत केकेआरने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात इंट्री केली आहे. यासह कोलकत्ता आता विजयी पदाचे सर्वांत मोठे दावेदार मानले जात आहेत. आता RCB, RR आणि SRH यांच्या पैकी कोणता संघ फायनलपर्यंत पोहचतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.