Viral Video: रीझा हेंड्रिक्सने अर्शदीप सिंगला मारला एवढा जबरदस्त षटकार की, पाहून भारतीय कर्णधार ही झाला अवाक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

Viral Video: रीझा हेंड्रिक्सने अर्शदीप सिंगला मारला एवढा जबरदस्त षटकार की, पाहून भारतीय कर्णधार ही झाला अवाक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

India vs South Africa 2nd T20: मंगळवारी, भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने असा फटका मारला की, तो विसरणे अशक्य आहे.

सेंट जॉर्ज पार्कवरील भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात रीझाने षटकार मारून चेंडू स्टेडियमवर पाठवला. हे सर्व डावाच्या दुसऱ्या षटकात घडले, त्यानंतर नवीन चेंडू आणावा लागला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यशस्वी जैस्वाल (0) आणि शुभमन गिल (0) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर टीम इंडियाने अवघ्या 6 धावांत 2 विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (56) याने तिलक वर्मा (29) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर सूर्याने रिंकू सिंगसोबत (नाबाद 68 धावा) 70 धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्याने 36 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. रिंकूने 39 चेंडूत नाबाद 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पावसामुळे खेळ 19.3 षटकांचा थांबवावा लागला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले.

Viral Video: रीझा हेंड्रिक्सने अर्शदीप सिंगला मारला एवढा जबरदस्त षटकार की, पाहून भारतीय कर्णधार ही झाला अवाक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

India vs South Africa:  डावाच्या दुसऱ्या षटकात चेंडू बदलावा लागला.

डावाच्या दुसऱ्या षटकासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे चेंडू सोपवला. ब्रित्झकेने दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून अर्शदीपची लाइन-लेन्थ खराब केली. त्यानंतर ५व्या चेंडूवर रीझा हेंड्रिक्सने चौकार ठोकला. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रिझाने असा फटका मारला की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. त्याच्या या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

रीझा हेंड्रिक्सने ने अर्शदीप सिंगला मारला जबरदस्त षटकार,पहा व्हिडीओ.

रीझाने अर्शदीपच्या राउंड-द-विकेट गोलंदाजीचा फायदा उचलत त्याची चांगलीच धुलाई केली. त्याने हा शॉट डीप मिडविकेटवर मारला आणि चेंडू स्टेडियमच्या आरपार पाठवला. मग नवीन चेंडू आणावा लागला. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या पुढच्याच षटकात संघाला पहिले यश मिळाले. ब्रित्झके ५व्या चेंडूवर धावबाद झाला. बाद होण्यापूर्वी रिझा आणि ब्रित्झके यांनी 42 धावांची सलामी दिली होती. ब्रित्झकेने 7 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *