Viral Video: शतक ठोकताच संजू सॅमसनने दाखवले बायसेप्स, पाहून कर्णधार राहुलने दिले खास रिएक्शन; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

संजू सॅमसन:  भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. संजू सॅमसनने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या सामन्यात संजू सॅमसनने 114 चेंडूत 108 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान संजूने 6 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. या सामन्यात शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनने तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

संजू सॅमसनचा जलवा... दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले एकदिवशीय क्रिकेटमधील पहिले शतक,टीम इंडियाने जिंकली मालिका..

IND vs SA: शतक ठोकताच संजूचा बायसेप्स सेलिब्रेशन,व्हिडीओ व्हायरल.

सामन्यात शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनने अगदी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. शतकानंतर संजूने ड्रेसिंग रुमच्या दिशेने आपले बायसेप्स दाखवले. संजूचे शतक साजरे करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संजूचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून चाहते या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही करत आहेत.

दुसरीकडे, हा क्षण संजू सॅमसनसाठी देखील खूप खास होता, कारण आतापर्यंत तो टीम इंडियासाठी 15 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता, परंतु आजपर्यंत त्याने आपल्या बॅटने एकही शतक झळकावले नव्हते. आता त्याच्या 16व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने पहिले शतक झळकावले आहे.

IND vs SA, 3rd ODI: केएल राहुल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, दक्षिण आफ्रिकेमध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो एकमेव भारतीय कर्णधार..

तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 8 गडी गमावून 296 धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक 108 धावांची खेळी खेळली. याशिवाय टिळक वर्माने 52 धावा केल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टिळक वर्मा यांचे हे पहिले अर्धशतक होते.

पहा संजू सॅमसनचा व्हायरल व्हिडीओ.

डावाच्या शेवटी रिंकू सिंगने आपली फिनिशरची भूमिका चोख बजावली. रिंकूने 27 चेंडूत 38 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत रिंकूने 3 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना बुरेन हेंड्रिक्सने सर्वाधिक ३ बळी घेतले.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *