IND vs AFG HEIGHLIGHTS: टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिवम दुबेने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांना वेड लावले. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दुबेने तुफानी फलंदाजी केली.
युवराज सिंगला आपला प्रेरणास्थान मानणाऱ्या शिवम दुबेने त्याच्या स्टाईलमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले,हे षटकार पाहून भारतीय संघाच्या डगआउटमध्ये बसलेले कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीदेखील स्वतःला आनंद व्यक्त करण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांची प्रतिक्रिया आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
Virat Kohli and Rohit Sharma enjoying the Dube Jaiswal show. pic.twitter.com/kV93c6krTG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2024
IND vs AFG : शिवम दुबेने ठोकले 3 लगातार षटकार, रोहित शर्माची प्रतिक्रिया तुफान व्हायरल..
भारताची फलंदाजी सुरु असतांना 10 व्या षटकात मोहम्मद नबी आपले दुसरे षटक टाकण्यासाठी आला होता. नबीने पहिला चेंडू कसा तरी टाकला, पण दुसरा चेंडू टाकताच दुबेने तो डीप फॉरवर्डवर मारला. हा गगनचुंबी षटकार पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला होता. यानंतर मोहम्मद नबीवरती प्रेशर वाढले आणि त्याची गोलंदाजीची लयच बिघडली.
पुढच्या चेंडूवर दुबे गुडघ्यावर बसला आणि त्याने पुन्हा त्याच दिशेने जोरदार षटकार मारला. हा षटकार पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीही थक्क झाले. त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या. दोघांची ही प्रतिक्रिया सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नबीच्या पुढच्याच चेंडूवर शिवम दुबेने पुढे येऊन पुन्हा एकदा फुल टॉस करून तिसरा चेंडू उचलला आणि त्याच दिशेने तिसरा षटकार मारून प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. एका पाठीमागे एक असे सलग तीन षटकार पाहिल्यानंतर स्टेडियम टाळ्यांचा गजर झाला. पुढच्या चेंडूवर एक धाव आणि पुढच्या चेंडूवर एक धाव डेत मोहम्मद नबीने कसा तरी षटक पूर्ण केले. नबीच्या या षटकातून एकूण २१ धावा झाल्या. विशेष म्हणजे यानंतर त्याने एकही षटक टाकण्याचा धोका पत्करला नाही.
शिवम दुबेने या सामन्यात झंझावाती खेळी करत 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार खेचले आणि नाबाद 63 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत यशस्वी जैस्वालनेही दुसऱ्या टोकाला दमदार फलंदाजी केली. जैस्वालने 5 षटकार आणि 6 षटकार लगावत 35 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिंकू सिंगने नाबाद 9 धावा केल्या. टीम इंडियाच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताने अवघ्या 15.4 षटकांत 6 विकेट्स राखून सामना जिंकला.
IND vs AFG : शिवम दुबेचा जलवा कायम, दोन्ही टी-२० मध्ये ठोकली अर्धशतके.
शिवम दुबेचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने पहिल्या T20 मध्ये नाबाद 60 धावा केल्या होत्या. एक विकेटही घेतली. आता त्याने बॅक टू बॅक अर्धशतके ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. या युवा खेळाडूच्या नावावर आता 20 सामन्यांमध्ये 3 अर्धशतके आहेत. त्याची सरासरी 35 पेक्षा जास्त आहे आणि स्ट्राइक रेट 140 च्या आसपास आहे. शिवम दुबेच भविष्यात टीम इंडियाचा ‘युवराज सिंग’ ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पहा व्हायरल व्हिडीओ.
Up, Up and Away!
Three consecutive monstrous SIXES from Shivam Dube 🔥 🔥🔥#INDvAFG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/3y40S3ctUW
— BCCI (@BCCI) January 14, 2024
हेही वाचा:
- IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात ‘हे’ 10 फलंदाज झालेत सर्वांत जस्त वेळा शून्यावर बाद, यादीमध्ये स्टार खेळाडूही सामील..!
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..