Viral video: विराट कोहली- गौतम गंभीरमध्ये पुन्हा भांडण, मात्र यावेळेस बीसीसीआयने केली मोठी शिक्षा, भांडणाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
Viral video: विराट कोहली- गौतम गंभीरमध्ये पुन्हा भांडण, मात्र यावेळेस बीसीसीआयने केली मोठी शिक्षा, भांडणाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
काल आयपीएल 2023 मध्ये 43वा सामना रोयाल चालेन्जर्स बंगलोर आणि लखनौ सुपर मध्ये खेळवला गेला. ज्यात आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवत सामना खिश्यात घातला. मात्र या सामन्यात एक अशी वादग्रस्त घटना घडली ज्यामुळे सर्वत्र क्रिकेटची बदनामी होत आहे. या सामन्याच्या दुसर्या डावामध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये वाद झाला आणि हा वाद एवढा मोठा होता की, तो सोडवण्यासाठी दोन्ही संघातील इतर खेळाडूंना बराच वेळ मध्यस्ती करावी लागली. याच वादामुळे आता बीसीसीआयने दोघांवर देखील कारवाई केली आहे.
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना एकमेकांसोबत भांडण करने महागात पडले आहे. त्यांना एकमेकांशी भांडण करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. दोघांमधील भांडण हाणामारीच्या मर्यादेपर्यंत पोहोचले नसले तरी जे घडले, ते क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळातील कितीही मोठे खेळाडू असले तरी ते चांगले मानले जात नाही. हे थेट क्रिकेटच्या नियमांच्या विरोधात आहे. कोहली आणि गंभीरला याची शिक्षा झाली.

कोहली आणि गंभीर हे आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. आणि त्याची शिक्षा म्हणून दोघांच्याही मॅच फीमध्ये कपात करण्यात आली आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याची फी दोघांनाही मिळाली नाही. शिक्षा म्हणून त्याच्या मॅच फीमध्ये 100 टक्के कपात करण्यात आली आहे.
या मोसमात विराट कोहलीला मिळालेली ही तिसरी शिक्षा आहे, जी त्याच्या मागील दोन चुकांपेक्षा मोठ्या चुकीसाठी देण्यात आली आहे. यापूर्वी आयपीएल 2023 मध्ये, फाफ डू प्लेसिसच्या जागी आरसीबीचे कर्णधार असताना त्याला स्लो ओव्हर रेटसाठी दोनदा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र यावेळी भांडण झाल्याने शिक्षा अधिकच देण्यात आली आहे.
विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघेही आयपीएल आचारसंहितेअंतर्गत लेव्हल 2 च्या गुन्ह्यांसाठी दोषी आढळले. दोघांनीही आपली चूक मान्य केली, त्यानंतर त्यांची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली. या दोघांशिवाय लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन-उल-हकही शिक्षेस पात्र ठरला आहे, त्याला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नवीनची चूक अशी होती की, तोच अगोदर कोहलीसोबतवाद करतांना दिसला होता. नंतर त्याच्या बचावासाठी गंभीर सामना संपल्यानंतर मैदानात आला होता.
पहा व्हिडीओ..
https://twitter.com/spychaitanya/status/1653234928711274496?s=20
लखनऊ आणि बंगळुरू यांच्यातील सामना संपल्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यातील लढत सुरू झाली. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटत असताना हा प्रकार घडला. यादरम्यान विराट आणि गंभीरमध्ये वाद झाला. वादाने तीव्र स्वरूप धारण केले, जे पाहून बाकीच्या खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.