- Advertisement -

IND vs SL LIVE: “शेर हमेशा शेर होता है” एकदिवशीय सामन्यातील 45 वे शतक ठोकताच उडी मारून ‘विराट कोहली’ने केले सेलिब्रेशन, व्हिडीओ पाहून चाहते झाले भलतेच खुश, सोशल मिडियावर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव.. पहा व्हायरल व्हिडीओ.

0 0

IND vs SL LIVE: “शेर हमेशा शेर होता है” एकदिवशीय सामन्यातील 45 वे शतक ठोकताच उडी मारून कोहलीने केले सेलिब्रेशन, व्हिडीओ पाहून चाहते झाले भलतेच खुश, सोशल मिडियावर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव.. पहा व्हायरल व्हिडीओ.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील  3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.जो  आतापर्यंत तितका प्रभावी सिद्ध झालेले नाही. भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबदरस्त फलंदाजी करत त्याचा हा निर्णय चुकीचा सिद्ध करून दाखवला.

भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची धमाकेदार सुरुवात करताना आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी करताना आणखी एक शतक झळकावले. त्यानंतर आता चाहते सोशल मिडियावर त्याच कौतुक करत आहेत..

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी स्टार फलंदाज विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना अप्रतिम शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक आहे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक आहे. विराटने या खेळीत तब्बल 113 धावा काढल्या. ज्यासाठी त्याने केवळ 87 चेंडू खेळले.

विराट कोहलीने 129.89 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 87 चेंडूत 113 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकारही दिसला आहे. विराटने 80 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. या एपिसोडमध्ये चाहत्यांनी सोशल मीडियावरही त्याची जोरदार स्तुती केली आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रियांवर एकदा नजर टाकूया.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया येथे पहा:

https://twitter.com/realpkmkb/status/1612772668377554946?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1612772668377554946%7Ctwgr%5E3153606dfd27e44598fccb61af2035fe45ff00ac%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ffans-reaction-on-virat-kohli-73rd-century-in-ind-vs-sl-1st-odi-2023%2F


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

 

Leave A Reply

Your email address will not be published.