शानदार..जबरदस्त.. एका पाठोपाठ शतक ठोकून किंग कोहलीने श्रीलंकेच्या गोलादाजांच्या उडवल्या झोपा, तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात विराट कोहलीने मोडले हे 7 विक्रम..
तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. त्याने 2023 मध्ये दुसरे शतक आणि सध्याच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 85 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे 46 वे शतक आहे, आपल्या या खेळीत त्याने एक नाही तर अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. या शतकी खेळीदरम्यान, कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत 5 व्या स्थानावर पोहोचला. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (12650) यांना मागे टाकून त्याने हा मोठा टप्पा गाठला.
View this post on Instagram
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे ज्याने 463 सामन्यांमध्ये 18426 धावा केल्या आहेत. त्याचवेळी कुमार संगकारा (14234) दुसऱ्या क्रमांकावर, रिकी पाँटिंग (13704) तिसऱ्या क्रमांकावर आणि सनथ जयसूर्या (13430) चौथ्या क्रमांकावर आहे.
१.वनडेत सर्वाधिक धावा
सचिन – १८४२६ (४५२ डाव)
संगकारा – 14234 (380 डाव)
पाँटिंग -१३७०४ (३६५ डाव)
जयसूर्या – १३४३० (४३३ डाव)
कोहली – १२६५१* (२५९ डाव)
विराट कोहलीचे हे श्रीलंकेविरुद्धचे 10 वे वनडे शतक आहे. यासह, तो कोणत्याही एका संघाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर कोहलीच्या बॅटने झळकावलेले हे 21वे शतक आहे. सचिन तेंडुलकरला मागे टाकत त्याने ही कामगिरी केली.
२. एका संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके
10 – विराट कोहली विरुद्ध श्रीलंका
९ – विराट कोहली वि. वि
९ – सचिन तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया
Another 100 for @imVkohli as India set 390/5 in 3rd ODI against Sri Lanka.
Kohli made an unbeaten 166.
It’s his 46th ODI century. https://t.co/NsYXVCw7ws#bbccricket #INDvSL pic.twitter.com/n57Mr8LA7K
— Test Match Special (@bbctms) January 15, 2023
३.घरच्या मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय शतके
21- विराट कोहली
20- सचिन तेंडुलकर
14- हाशिम आमला
14- रिकी पाँटिंग
घरच्या मैदानावर सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या बाबतीत कोहलीने रिकी पाँटिंगलाही मागे टाकले आहे. कोहलीने आत्तापर्यंत भारतीय भूमीवर ४६ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.
४.घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ५०+ धावा:
58 – सचिन तेंडुलकर
46 – जॅक कॅलिस
46 – विराट कोहली
45 – रिकी पाँटिंग
५.एकदिवशीय क्रिकेटमधील सर्वांत जास्त वेळा 100+ भागीदारी
९९ वेळा – सचिन तेंडुलकर
७३ वेळा – विराट कोहली
७२ वेळा – रिकी पाँटिंग
६.वनडेत सर्वाधिक शतके
49- सचिन तेंडुलकर
46- विराट कोहली
30- रिकी पाँटिंग

७.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
100- सचिन तेंडुलकर
74- विराट कोहली
71- रिकी पाँटिंग
आपल्या ताबडतोब खेळीमध्ये विराटने वरील सर्व रेकोर्ड मोडले आहेत.विराटची आजची खेळी ही डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये विराटने वाईट काळातून जातांना एकही शतक ठोकले नव्हते मात्र आता 2023 मध्ये पहिल्या 15 दिवसातच विराट 2 शतक ठोकून बसलाय. त्यामुळे विराटचे चाहते भलतेच खुश आहेत.
श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांची गरज.
प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाने शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या शतकांच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत 390 धावा काढल्या आणि श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी 391 धावांचे लक्ष दिले आहे. आता श्रीलंकन फलंदाज हे लक्ष पार करणार की भारतीय गोलंदाज त्यांना रोखण्यात यशस्वी होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे..
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…