किंग कोहलीचा जलवा… ! पहिल्या सेमीफायनल मध्ये मोडला सचिन तेंडूलकरचा ‘हा’ मोठा विक्रम,ठरला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू.
IND vs NZ 1st Semifinal: विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा,काही ना काही विक्रम नक्कीच मोडीत निघतो. असेच काहीसे विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाहायला मिळाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचे नाव प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होताच त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. विराट कोहलीने वानखेडेवर सचिनने आपल्या दोन दशकांच्या एकदिवसीय कारकिर्दीत जे साध्य केले नाही ते साध्य केले. विराट कोहलीने कोणता विक्रम आपल्या नावावर केला आहे ते जाणून घेऊया अगदी सविस्तर..
सचिनला मागे टाकत विराट कोहली ठरला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू.
एकदिवसीय विश्वचषकात चार सेमीफायनल खेळणारा विराट कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीने 2011 मध्ये वर्ल्ड कपमध्ये पहिला सेमीफायनल खेळला होता. टीम इंडियाने हा वर्ल्ड कपही जिंकला होता. यानंतर २०१५ मध्ये विराटने ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरी खेळली होती. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात विराट कोहलीने उपांत्य फेरी गाठली होती आणि आता २०२३ मध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीला विश्वचषक उपांत्य फेरी खेळण्याचा मान मिळाला आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 6 विश्वचषक खेळले आणि यादरम्यान तो केवळ तीन वेळा उपांत्य फेरीत खेळू शकला. सचिन 1996, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठू शकला होता. आता विराट कोहलीने त्याला मागे टाकले आहे. मात्र, विराट कोहली विश्वचषक २०२३ मध्ये त्याचा आणखी एक विक्रम मोडू शकतो.
सचिनचा विश्वविक्रम धोक्यात.!
सचिनचा आणखी एक विश्वविक्रम विराटच्या निशाण्यावर आहे. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीतील कोणत्याही फलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या विश्वचषकात विराट कोहलीने 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. म्हणजे विराट कोहलीला सचिनला मागे टाकण्याची संधी आहे.
विराटला 50 शतके करण्याची संधी !
विराट कोहलीने सचिनच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता या विश्वचषकात शतक झळकावून विराट सचिनला मागे टाकू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने ही कामगिरी करावी अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे.
- हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..