बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली मोडू शकतो हे 3 मोठे विक्रम, कसोटीतील शतकांच दुष्काळ संपणार..
बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली मोडू शकतो हे 3 मोठे विक्रम, कसोटीतील शतकांच दुष्काळ संपणार..
बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा २ -१असा पराभव करून मालिका जिंकली. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबरपासून चितगाव येथे खेळवला जाणार आहे.
या मैदानावर वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला होता ज्यात टीम इंडियाने २२७ धावांनी विजय मिळवला होता. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज मैदानावर कसून सराव केला. भारताच्या माजी कर्णधाराने त्याच्या सराव सत्राचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात या मैदानावर कोहलीच्या बॅटमधून ११२ धावांची शानदार शतकी खेळी झाली. कसोटी मालिकेतही कोहली आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तथापि, तो एकदिवसीय पेक्षा वेगळा आहे. याच कारणामुळे या उजव्या हाताच्या फलंदाजाला महत्त्वाच्या सामन्यापूर्वी खेळपट्टी चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. विराटने त्याच्या सराव सत्राचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात तो नेटवर फलंदाजी करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार आपल्या कसोटी कारकिर्दीत बांगलादेशी संघाविरुद्ध आतापर्यंत केवळ चार सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने पाच डावांत ७८.४० च्या सरासरीने ३९२ धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्धही कोहलीच्या बॅटमधून दोन शतके झळकली आहेत. कोहली चा फॉर्म बघता तो पाठीमागील सर्व विक्रम मोडून नवा इतिहास रचेल असा अंदाज मानला आहे.
कोहलीचा उत्कृष्ट फॉर्म पाहून कोहली कसोटीतही शतकाचा दुष्काळ संपवेल अशी आशा चाहत्यांना आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने जवळपास तीन वर्षांपूर्वी त्याच संघाविरुद्ध कसोटी फॉर्मेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..