तुम्हाला माहिती आहे का विराट कोहलीने त्याच्या पहिल्या वनडे सामन्यात किती धावा केल्या होत्या? वाचा ही बातमी

विराट कोहली

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा सर्वकालीन महान फलंदाज आहे. सचिनचा उत्तर अधिकारी मानला जाणारा विराट आपल्या क्रिकेटकारकर्दीमध्ये धावांच्या राशी उभा केल्या आहेत. त्याचीही अद्वितीय कामगिरी जवळपास कोणत्याही फलंदाजाला मोडणे अशक्यच आहे. वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय संघातला अविभाज्य घटक मानला जातो. धावांचा पाठलाग करत असताना तो आणखीन कणखर आणि आक्रमक होऊन खेळतो.

 

विराट कोहली
विराट कोहली

जागतिक क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम करणाऱ्या या खेळाडूने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात किती धावा केल्या होत्या. याची माहिती आज आपण घेऊयात. 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टीम इंडियाच्या या धुरंदर खेळाडूंने पहिल्याच सामन्यात 22 चेंडूत 12 धावा करून बाद झाला होता. विराटने पाच वनडे सामन्यांच्या या मालिकेमध्ये 31.80च्या सरासरीने 159 धावा केल्या होत्या. या मालिकेमध्ये त्याने एकमेव अर्थ शतक ठोकले होते. त्यानंतर तो वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघात खेळताना सातत्याने धावा काढत संघातले स्थान पक्के करून घेतले. 2008 मध्ये 19 वर्षाखालील विश्व चषक स्पर्धेमध्ये विराट कोहलीने भारतीय संघाला विजेतेपद पटकावून दिले होते. त्यावेळी तो भारतीय संघाचे नेतृत्व करत होता.

विराट कोहली
विराट कोहली

 

विश्वचषक स्पर्धेतील धमाकेदार कामगिरीनंतर त्याला आयपीएल मध्ये आरसीबी च्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या दोन्ही इव्हेंट्स मध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने दोन्ही हाताने सोने करत आज जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहे. कोहलीने आतापर्यंत एकूण 292 सामने खेळले असून त्यात 13848 केल्या आहेत.

 

विराट कोहली आयपीएल मध्ये 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतोय. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकदा अंतिम सामना खेळला होता मात्र त्याला एकदाही आयपीएलचा चषक आरसीबीच्या संघाला जिंकून देता आला नाही ही खंत त्याच्या मनात आजही कायम आहे. कोहली आयसीसी 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013 आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा सदस्य आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य आधारस्तंभ असलेला विराट कोहली हा फलंदाजीत हिट नसून तो आपल्या फिटनेसच्या बाबतीत ही इतर खेळाडूंच्या तुलनेने तंदुरुस्त आहे. मागील काही वर्षापासून त्याने आपल्या फिटनेस मध्ये जबरदस्त सुधारणा केली आहे. तो त्याच्या डायटवर विशेष लक्ष देतो.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.