पुन्हा ‘विराट कोहली’ ठरला चुकीचा निर्णयाचा बळी….वादग्रस्त एलबीडब्ल्यूमुळे बाद देताच विराट कोहलीला राग अनावर,मैदानातच केले असे कृत्य.. व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताणा 263 धावा केल्या.

भारताची सुरूवात खराब झाली. पण टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली चांगली फलंदाजी करताणा दिसला. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या धावसंख्येसाठी सज्ज झाला होता, परंतु एका वादग्रस्त एलबीडब्ल्यूमुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
35 धावांच्या स्कोअरवर भारताची सहावी विकेट पडली. विराट कोहली 84 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. कुहमानने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले.
अंपायरने कोहलीला आऊट दिला, पण त्याने रिव्ह्यू घेतला. चेंडू एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले, पण अंपायरने त्याला बाद घोषित केले. हा निर्णय वादग्रस्त ठरू आहे.
Unlucky 💔
Very poor decision by umpire#ViratKohli #BGT2023 #INDvAUS pic.twitter.com/9LMZcaqLqD— Usama Umair (@Usamaumair777) February 18, 2023
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण