VIRAL VIDEO: कोलकात्यातील श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर विराट-इशानने केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल..

VIRAL VIDEO: कोलकात्यातील श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर विराट-इशानने केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने कमी धावसंख्येच्या सामन्यात 4 विकेट्सने सामना जिंकला. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकाही २-० ने जिंकली.
त्याचवेळी, सामन्यानंतर, ईडन गार्डन्सवर एक लाइट शो देखील झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने देखील उत्साहाने भाग घेतला. या एपिसोडमध्ये युवा स्टार फलंदाज इशान किशन आणि अनुभवी खेळाडू विराट कोहलीही डान्स करताना दिसले. ज्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

खरंतर, विराट कोहली आणि ईशान किशन श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेनंतर ईडन गार्डन्सवर लाईट शोमध्ये डान्स करताना दिसले. विराट आणि ईशान स्टेप बाय स्टेप डान्स करत होते. दोन्ही खेळाडू लाइट शोचा खूप आनंद घेत होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 2.5 लाखांहून अधिक लोकांनी पहिला आहे.
याशिवाय विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार शतक झळकावले होते. विशेष म्हणजे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला.
असा होता दुसरा एकदिवशिय सामना.
श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यांना चुकीचे सिद्ध करण्यात कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. यादवने 3 बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. श्रीलंकेला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत आणि अवघ्या ३९.४ षटकांत २१५ धावा करून सर्वबाद झाला. विशेष म्हणजे यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. 86 धावांवर भारताने 4 विकेट गमावल्या.
पण यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यात चांगली भागीदारी झाली. तर राहुलने शेवटपर्यंत फलंदाजी सुरू ठेवली. त्यामुळे भारताने हा सामना ४ विकेटने जिंकला. राहुलच्या नाबाद 64 धावांच्या खेळीने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मालिकेचा तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना 15 तारखेला खेळवला जाणार आहे. ज्यात भारतीय संघ तो सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवाश देण्याच्या प्रयत्नात असेल तर श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.
येथे पहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ.
Virat Kohli & Ishan Kishan dancing during the light show at Eden. pic.twitter.com/WRw8Xb5msC
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: