भारतामध्ये सर्वाधिक श्रीमंत लोक हे बॉलिवूड मध्ये आणि क्रिकेट मध्ये आपल्याला आढळतात. बॉलिवूड आणि क्रिकेटर लाईफ स्टाईल म्हटल की समोर येते ती म्हणजे पैसा प्रसिद्धी आणि जीवनशैली. क्रिकेट च्या माध्यमातून क्रिकेटर महिन्याला करोडो रुपये कमवतात हे आपल्याला माहीतच आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन विराट कोहली याची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेणार आहोत.
भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली हा दिवसाला करोडो रुपयांची कमाई करणारा खेळाडू आहे. विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघातील एक आक्रमक खेळाडू आहे.
विराट कोहली हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. तसेच विराट कोहली ची एकूण ही 980 करोड रुपये आहे.विराट कोहली हा सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. तसेच विराट कोहली चा बीसीसीआयसोबत A+ ग्रेड करार आहे. ज्याद्वारे विराट कोहली ला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. तसेच कसोटी, एकदिवसीय आणि T20 खेळण्यासाठी त्याला वेगळी रक्कम मिळते.
तसेच विराट कोहली IPL मधून सुद्धा एकदम तगडी कमाई करत आहे संघात खेळण्यासाठी विराट कोहली ला प्रत्येकी सीझन ला 20 करोड रुपये मिळतात.
तसेच विराट कोहली हा अनेक प्रॉडक्ट चा एंडोर्समेंट आहे. तसेच विराट कोहली हा विराट कोहली हा wrogn, One8, Puma, MRF आणि Audi सारख्या अनेक आघाडीच्या ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यामधून वर्षाकाठी विराट कोहली हा 178.77 करोड रुपये कमवतात.
सध्या विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत मुंबईतील वरळी येथे ७००० चौरस फुटांच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. या घराची किंमत सुमारे 34 कोटी रुपये आहे.
तसेच विराट कोहली च्या कार कलेक्शन मध्ये R8 V10 Plus, R8LMX, Audi RS5, Audi Q8, Land Rover Vogue, Lamborghini Gallardo, Bentley Flying Spur आणि Bentley Continental GT या लक्सरी कार चा समावेश आहे. या कार ची किंमत ही. करोडो रुपयांत आहे.