ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
IPL 2024: आयपीएल 2024ला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात एम ए चीदंबरम स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघाने आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र बंगळुरूचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज विराट कोहली कॅम्पमध्ये कुठेच दिसून येत नाही. नुकतेच खूप दिवसानंतर तो भारतात पाहायला मिळाला. लवकरच तो आरसीबीच्या कॉम्पमध्ये दाखल होणार आहे.
नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने आपले नाव माघारी घेतले होते. कौटुंबिक कारण पुढे करत विराट कोहलीने या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. नुकतेच विराट दुसऱ्यांदा वडील झाला आहे. यामुळे त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. काही दिवसापूर्वी विराट कोहलीला दुसरे अपत्य झाले असून त्याचे नाव ‘अकाय’ असे ठेवण्यात आले आहे.
कोहलीच्या मुलाचा जन्म झाला होता, त्यावेळी तो लंडन येथे होता. मुलाच्या जन्मानंतर तो पहिल्यांदाच भारतामध्ये दिसून आला. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने सरावाला सुरुवात केली आहे. मात्र कॅम्पमध्ये विराट कोहली कुठेच दिसून येत नाही. 19 मार्च रोजी बंगळूर येथे आरसीबीचा अनबॉक्स हा इव्हेंट होणार आहे. यामध्ये माजी कर्णधार सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत होती. मात्र तत्पूर्वी विराट कोहली भारतात दाखल झाला असून लवकरच या कार्यक्रमांमध्ये तो सहभागी होऊ शकतो.
विराट कोहलीचा एक लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो विमानतळावर दिसून येतोय. हा व्हिडिओ वायरल भयानी यांनी आपल्या Instagram अकाउंट वर शेअर केला आहे. ज्यामध्ये हा 35 वर्षे खेळाडू त्याच्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये बसून घरी परततोय. विराट कोहलीचा हा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
आयपीएल 2024 साठी सर्वच खेळाडू तयारीला लागले आहेत. मात्र विराट कोहली या तयारी पासून दूर आहे. तो नुकतेच भारतात परतला असून लवकरच तो संघाच्या कॅपमध्ये दाखल होणार आहे. त्याच्यासाठी हे आयपीएल खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण लवकरच टी ट्वेंटी 2024 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा होणार आहे. आता संघातील विराट कोहलीच्या जागेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे विराट कोहलीला आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करून टीकाकारांना चोख उत्तर देता येणार आहे.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.