IND vs SA : विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात काल (5 November) ईडन गार्डन्सवर झालेला सामना विराट कोहलीसाठी खूप खास आहे. त्याच्या वाढदिवशीच त्याने आव्हानात्मक खेळपट्टीवर लढाऊशतक झळकावत चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्माने 24 चेंडूत 40 धावा केल्या. त्याचवेळी गिल २३ धावा करून बाद झाला आणि डाव पुढे नेण्याची जबाबदारी विराट कोहली आणि श्रेयस अय्यरवर पडली.
विराट कोहलीने सावध फलंदाजी करत फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपला डाव खेळला. कोहलीने वाढदिवसाच्या दिवशी शात्कीय खेळी करत अनेक विक्रम मोडले. कोणते ते पाहूया..
IND vs SA : शतकीय खेळी करत विराट कोहलीने मोडले हे विक्रम..
-
भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा करणारा विराट कोहली सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
-
विश्वचषकात 1500 धावा पूर्ण करणारा विराट कोहली सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
-
विराट कोहिलने यंदाच्या विश्वचषकात 8 डावात 6 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये बांगलादेशविरुद्ध केलेल्या शतकाचाही समावेश आहे.
-
वनडे इतिहासात सर्वाधिक ५० हून अधिक धावा करणाऱ्या विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
-
सचिन तेंडुलकरने 452 डावांमध्ये 145 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कोहलीने 278 डावांमध्ये 119 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
6.विराट कोहलीनेही यंदाच्या विश्वचषकात आपल्या ५०० धावा पूर्ण केल्या आहेत.
7.विराट कोहलीने या सामन्यात शतक ठोकत सचिन तेंडूलकर च्या एकदिवशीय सामन्यातील शतकांची बरोबरी केली आहे. दोघांच्याही नावे आता एकदिवशीय क्रिकेटमध्ये 49 शतक आहेत.