VIRAL VIDEO: केपटाऊनमध्ये सामना जिंकल्या नंतर विराट- गीलने केला गरबा,व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..

विराट

VIRAT KOHALI SHUBHMAN GILL DANCE: भारतीय संघाने केपटाऊनमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. सेंच्युरियनमध्ये ब्लू संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते मात्र केपटाऊनमध्ये यजमान संघाचा सात गडी राखून पराभव करत रोहित आणि कंपनीने मालिका  बरोबरी केली आहे. विराट कोहली त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या कृती आणि प्रतिक्रियांमुळेही चर्चेत असतो. केपटाऊनमध्ये, जिथे प्रथम भगवान राम सारखे धनुष्य चालवण्याची किंवा एल्गारशी बोलण्याची आणि नंतर त्याला मिठी मारण्याची त्याची कृती गाजली होती तशीच आता  गिलसोबतचा विराटचा  डान्सही चर्चेत आला आहे.

गिल-विराटचा गरबा व्हिडिओ तुफान  व्हायरल!

केपटाऊन कसोटी सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूही पूर्ण मस्ती करताना दिसले. विशेषतः अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली आणि युवा फलंदाज शुभमन गिल. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो लहानपणीचा खेळ खेळताना दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर काही चाहते याला गरबा डान्सही म्हणत आहेत.

केपटाऊन कसोटीतील विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, कमी धावसंख्येच्या सामन्यात या दोन खेळाडूंची कामगिरी चांगली होती. संघासाठी पहिल्या डावात गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 55 चेंडूत 36 धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने ५९ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. दरम्यान, त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि एक षटकार आला.

विराट

दुसऱ्या डावात गिलने 11 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा केल्या तर विराट कोहलीने 11 चेंडूत 12 धावा काढल्या. भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना सात गडी राखून जिंकला आहे. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली आहे.


हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *