भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला सध्या भारतीय संघात आहे मात्र तो एक खेळाडू म्हणून..
गेल्या वर्षी आयपीएलच्या आगोदर कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाचा टी-२० कर्णधार म्हणून राजीनामा दिला होता, त्याच्यासोबत त्याने आयपीएल संघ आरसबीच्या कर्णधारपदाचा सुद्धा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतर त्याच्यासोबत जे झाल त्याच्या धक्कादायक खुलासा कोहलीने एका मुलाखतीती केला आहे.
टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहली आणि संघाला डिसेंबर मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवशीय सामन्याची सिरीज खेळायची होती.
सिरीजच्या पहिल्या सामन्याच्या आदल्या दिवशी कोहलील मिडिया मार्फत कळले की तो आता एकदिवशीय संघाचा सुद्धा कर्णधार राहिला नाही. त्याच्या जागी बीसीसीआयने रोहित शर्माला कर्णधार म्हणून नेमले आहे. याविषयी बोलताना कोहली म्हणाला की,
View this post on Instagram
पहिल्या सामन्याच्या आगोदर निवडकर्त्यांसोबत माझी चर्चा झाली मात्र त्या चर्चेत फक्त संघ कोणता निवडायचा? कोणाला संधी द्यायची? आणि रणनीती काय असेल यावर तब्बल दोन तास चर्चा झाली. मात्र त्यात कुठेही एकदिवशीय सामन्यात कर्णधारपद माझ्याकडून काढून घेतले जातंय याबद्दल माहित दिली गेली नाही.
शिवाय त्या सामन्यात मी कर्णधार म्हणून खेळतोय अशी मानसिकता तयार करून होतो. मात्र एकदिवस आधी मला ही सर्व गोष्ट समजली.नंतर मला एका अधिकाऱ्याने सांगितले की निवड समितीतील 5 सदस्य आणि इतर लोकांना मिळून हा निर्णय घेतला गेला होता, अस सांगितले.त्याआधी माझ्यासोबत काहीही चर्चा झाली नाही.

पुढे बीसीसीआयच्या याचं निर्णयामुळे कोहलीचे मन दुखले आणि त्याने कसोटी संघाचा कर्णधारपदाचा सुद्धा राजीनामा दिला. आज विराट कोहली संघात फक्त एक फलंदाज म्हणून खेळतोय. अंतर त्याच्या मनात हो गोष्ट आजही रुततेय की त्याच्याशी चर्चा न करता त्याला एकदिवशीय संगाच्या कर्णधार पदावरून काढण्याचा निर्णय घेतला गेला.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: ‘भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार’ परंतु ,वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने भारतीय संघावर केले मोठे वक्तव्य.. दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…