Viral Video: कसोटीमध्ये शतक ठोकताच खुश झालेल्या विराट कोहलीने केला जबरदस्त डान्स, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल.. एकदा पहाच..

Viral Video: कसोटीमध्ये शतक ठोकताच खुश झालेल्या विराट कोहलीने केला जबरदस्त डान्स, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल.. एकदा पहाच..
भारतीय संघाचा स्टार खेळडू विराट कोहलीने फॉर्ममध्ये परतल्यानंतर सर्वच भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत . मॅचनंतर त्याने आयपीएलचा प्रोमो शूट केला, तर आता विराट कोहलीचा नॉर्वेच्या प्रसिद्ध डान्स ग्रुप क्विक स्टाइलच्या सदस्यांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोहलीने स्वतः हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Guess who I met in mumbai 🔥👀 @TheQuickstyle pic.twitter.com/wbHcM6JRo9
— Virat Kohli (@imVkohli) March 14, 2023
विराट कोहलीने क्विक स्टाइल या डान्स ग्रुपसोबत एक शूट केले आहे, यादरम्यान कोहलीने एक रील बनवला आहे, ज्यामध्ये विराट कोहली डान्स ग्रुपच्या सदस्यांसोबत बॅट घेऊन डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत विराटने लिहिले की, ‘मुंबईत मी कोणाला भेटलो याचा अंदाज लावा.’

क्विक स्टाईल ग्रुपसोबत विराट कोहलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण या व्हिडिओमध्ये विराट कोहलीची वेगळी स्टाइल लोकांना पाहायला मिळत आहे.
हा ग्रुप बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
View this post on Instagram
नॉर्वेचा डान्स क्रू क्विक स्टाइल बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. नुकताच या ग्रुपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ग्रुपमधील सदस्यांनी गुरू रंधवाच्या काला चष्मा गाण्यावर डान्स केला होता. याशिवाय या ग्रुपने अनेक गाण्यांवर डान्सही केला आहे.
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…