विराट पुन्हा होणार बापमाणूस..! अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर,लवकरच विराटच्या घरी नवा पाहुणा…
टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली (Virat Kohali) आणि अभिनेत्री असलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, हे सुंदर कपल आता 3 ते 4 होणार आहे, सोप्या शब्दात विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार आहे. या बातमीला आम्ही दुजोरा दिला नसून हिंदुस्तान टाइम्सने दुजोरा दिला आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या सुंदर जोडप्याने २०१७ मध्ये लग्न केले आणि २०२१ मध्ये त्यांच्या घरी एका सुंदर कन्येचाजन्म झाला आणि त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘वामिका कोहली’ असे ठेवले. वामिकाच्या बाबतीत वीराट अनुष्का खूप काळजी घेत आहेत. आजूनही त्यांनी तिचा चेहरा सोशल मिडियापासून लांब ठेवलाय.
स्टार जोडप्याच्या घरात पुन्हा किंकाळ्या गुंजणार,अनुष्का विराट बनणार दुसऱ्यांदा मातापिता.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई होणार आहे. अनुष्का शर्मा गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीतून जात आहे, हे स्टार जोडपे पुन्हा एकदा त्यांच्या घरात दुसऱ्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. जरी या जोडप्याने अद्याप या बातमीला अधिकृतपणे दुजोरा दिला नसला तरी, अशी अपेक्षा आहे की लवकरच काही मोठ्या प्रसंगी हे जोडपे त्यांच्या चाहत्यांसह चांगली बातमी शेअर करू शकेल. काही लोक असे म्हणत आहेत की विराट कोहली 5 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवसाला ही बातमी शेअर करू शकतो.
अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटामध्ये दिसली नाही,
अभिनेत्री अनुष्का शर्मा बर्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे, अलीकडेच अनुष्का आणि विराट एका प्रसूती क्लिनिकला भेट देताना दिसले आणि त्यांना पॅप्सने देखील पाहिले होते . मात्र हे फोटो कुठेही शेअर करू नका असे आवाहन या जोडप्याने केले होते. अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही आणि याशिवाय ती कोणत्याही क्रिकेट मैदानातही दिसलेली नाही.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत वर्ल्ड कपसाठी तयारी करत असून वर्ल्ड कपपूर्वी त्याचा फॉर्मही सुधारला आहे. टीम इंडियाला 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि टीम इंडियाच्या यशाची तार विराट कोहलीच्या बॅटशी जोडली गेली आहे. या स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटने काम केले तर, टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकते. विराट कोहली आपल्या घरी येणाऱ्या छोट्या पाहुण्याला विश्वचषक भेट देऊ शकतो, असे अनेक चाहते आता म्हणत आहेत.
हेही वाचा: