ईशान किशन पाठोपाठ विराट कोहलीनेही ठोकले ताबडतोब शतक, 44 व्या शतकासाठी विराट कोहलीने मोडले हे मोठे विक्रम..
बांगलादेशी संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. अशा स्थितीत हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, विजयाची नोंद करून क्लीन स्वीप टाळायचा आहे.
दुखापतीमुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप सेन आणि दीपक चहर या सामन्यातून बाहेर पडले आहेत. रोहितच्या बाहेर पडल्यामुळे केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे.
View this post on Instagram
भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर काही विशेष करू शकला नाही. श्रेयसला इबादत हुसेनने लिटन दासच्या हाती झेलबाद केले. श्रेयसने तीन धावांचे योगदान दिले. भारताची धावसंख्या 38.1 षटकांनंतर 3 बाद 320 आहे. विराट कोहली 97 आणि केएल राहुल 0 धावा करत खेळत आहे.
इशान किशनची अत्यंत संस्मरणीय खेळी संपुष्टात आली आहे. ईशान किशनने बाद होण्यापूर्वी 210 धावांची खेळी केली. इशानने 131 चेंडूंच्या खेळीत 24 चौकार आणि 10 षटकार ठोकले.
तस्किन अहमदने इशान किशनची विकेट घेतली. लिटन दासने इशानला लाँगऑफवर झेलबाद केले. भारताची धावसंख्या 36.1 षटकानंतर 2 बाद 306 अशी आहे. विराट कोहली 86 आणि श्रेयस अय्यर एक धाव करून खेळत आहेत.

ईशान किशनने इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्ध ईशान किशनने द्विशतक झळकावले आहे. इशान किशनने मुस्तफिझूर रहमानच्या चेंडूवर सिंगल घेत हा विक्रम केला. ईशानने द्विशतक झळकावण्यासाठी 126 चेंडू घेतले आणि त्याने 23 चौकार आणि 9 षटकार ठोकले
. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा इशान किशन हा चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी भारताकडून रोहित शर्माने तीन, तर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने प्रत्येकी एका वेळी द्विशतक झळकावले.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट :