आयपीएल 2024

‘वो क्या ही उखाड लेगा” सनरायजर्स हैद्राबादच्या नवीन कर्णधाराची घोषणा होताच ,आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य; ऐकून काव्या मारणला येईल राग…

सनरायजर्स हैद्राबाद:  आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्रा याने आयपीएल संघसनरायजर्स हैद्राबादच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. संघाच्या कर्णधार बदलाबाबत माजी खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे.

याशिवाय आकाशने संघाचा कर्णधार बनवलेल्या खेळाडूवरही मोठे वक्तव्य केले आहे.नक्की काय म्हणाला आकाश चोप्रा जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून..

IPL 2024: आकाश चोप्राने सनरायजर्स हैद्राबाद संघावर जोरदार टीका केली

IPL 2024: सनरायझर्स हैदराबादच्या नव्या कर्णधाराची घोषणा, २ वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूकडे सोपवली संघाची कमान..

आगामी २०२४ च्या आयपीएल (IPL 2024) स्पर्धेसाठी पॅट कमिन्सची सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर हैदराबाद संघाचा 10 वा कर्णधार होण्याचा मान कमिन्सला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा उदयोन्मुख खेळाडू एडन मार्करामच्या जागी कमिन्सला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने हैदराबाद संघाच्या या निर्णयावर टीका केली आहे. आकाश म्हणतो की, कमिन्स इतका प्रभावी खेळाडू नाही. कारण तो ना डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करतो ना पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतो

आकाश चोप्रा पुढे बोलतांना  म्हणाला,

“तुम्ही पॅट कमिन्सला कर्णधार बनवले आहे. त्याच्या अलीकडील आयपीएल धावांवर तुम्ही लक्ष दिले आहे का? गोलंदाजी करताना भरपूर धावा देणाऱ्या कमिन्सने बॅटनेही फारशा धावा केल्या नाहीत. तसेच पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये कधीही गोलंदाजी केली नाही. तो संपूर्ण आयपीएल खेळेल का? तुम्ही अशा खेळाडूवर खूप पैसा खर्च केला आहे ज्याबद्दल कोणतीही खात्री नाही. त्याच्याबद्दल बोलायचं तर हिंदीमध्ये एक म्हण आहे, कोई क्या ही उखाड लेगा. तसच कमिन्स या हंगामात काय करू शकेल असं मला वाटत नाही.”

 

“आयपीएलमध्ये कमिन्स काहीही अप्रतिम दाखवू शकला नाही” – आकाश चोप्रा

'वो क्या ही उखाड लेगा" सनरायजर्स हैद्राबादच्या नवीन कर्णधाराची घोषणा होताच ,आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य; ऐकून काव्या मारणला येईल राग...

तसेच आकाश चोप्रा म्हणाला – जरी त्याने विश्वचषक जिंकला असला तरी त्याने कधीही टी-20 ट्रॉफी जिंकली नाही. कमिन्सच्या जागी हेनरिक क्लासेन आणि ट्रॅव्हिस हेड कर्णधार होऊ शकतात. मार्करामने हैदराबादसाठी खूप काही केले आहे. सनरायझर्स इस्टर्न केपने सलग दोन वर्षे SA20 मालिका विजेतेपद पटकावले. पण आयपीएलमध्ये हा संघ काही खास दाखवू शकला नाही यामागे योग्य कर्णधार नाही हे देखील एक कारण असल्याचे आकाश ने सांगितले.

एकंदरीत आता  पॅट कमिन्स यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्यावर लागलेल्या बोलीला साजेशी कामगिरी करतो की  आकाश चोप्रा म्हणतोय तसं पैसे बुडवणारी खेळी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button