Virat kohli affairs: जेव्हा एखादा क्रिकेट स्टार यशाच्या पायऱ्या चढू लागतो तेव्हा चाहत्यांना त्याच्या खेळापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. असाच एक क्रिकेटर म्हणजे विराट कोहली, ज्याने 2008 साली भारतासाठी पदार्पण केले आणि काही वर्षांतच क्रिकेट जगतात एक खास स्थान निर्माण केले आणि आज त्याची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते.
एक काळ असा होता जेव्हा, कोहलीच्या फलंदाजीच्या चर्चेसोबतच त्याच्या लव्ह लाईफबद्दलही क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा होत होती, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केले जायचे..
आज विराट कोहलीचा वाढदिवस त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला विराट कोहलीने आतापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींना डेट केलं आहे याबद्दल माहिती देणार आहोत.. कोहलीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असले तरी आजही त्याच्या एक्स गर्लफ्रेंड आणि लव्ह लाईफची क्रिकेट जगतात चर्चा होते. चला तर मग जाणून घेऊया विराट कोहलीच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल.
इसाबेल लेट
टीम इंडियामध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या काही वर्षांनी विराट कोहलीचे नाव चित्रपट अभिनेत्री आणि सुंदर ब्राझिलियन मॉडेल इसाबेल लेट हिच्याशीही जोडले गेले. 2013 मध्ये, विराट कोहली आणि इसाबेल सिंगापूरमध्ये एकत्र फिरतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. काही वर्षांनंतर इसाबेलने तिच्या एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला की ती विराट कोहलीसोबत 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
तमन्ना भाटिया
2008 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणारा विराट कोहली पहिल्यांदा दक्षिण भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत (virat kohli & tamanna bhatia) एक्स-गर्लफ्रेंडमध्ये जोडला गेला होता. कोहली आणि तमन्ना यांची पहिली भेट २०१२ मध्ये एका सेलफोन अॅड शूट दरम्यान झाली होती. ही जाहिरात फारशी चालली नसली तरी त्यांच्या नात्याने अनेक बातम्या निर्माण केल्या. काही दिवसांनंतर, त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली, ज्याचे कारण ब्राझिलियन मॉडेल इसाबेलला देण्यात आले. तमन्ना ही या काळात खूप वेळा विराट कोहली सोबत दिसली होती तर त्याला सपोर्ट करण्यासाठी ती क्रिकेटच्या सामन्यात सुद्धा दिसली होती.

अनुष्का शर्मा: तमन्ना नंतर फायनली विराटच्या आयुष्यात इंट्री झाली ती अनुष्का शर्माची. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने वैयक्तिक आयुष्यात प्रवेश केला तेव्हा विराट कोहलीने क्रिकेटच्या दुनियेत नुकतीच 4 वर्षे घालवली होती. 2013 मध्ये एका शॅम्पूच्या अॅड शूटदरम्यान दोघेही पहिल्यांदा भेटले होते आणि त्यानंतर भेटीची मालिका सुरू झाली.
यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये दिसली आणि इथूनच त्यांच्या डेटींगच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यानंतर विराट आणि अनुष्का अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले पण त्यांनी एकमेकांना डेट केल्याचे मान्य केले नाही. यानंतर टीम इंडियाच्या अनेक सामन्यांमध्ये अनुष्का शर्मा कोहलीला चीअर करताना दिसली आणि यावरून दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही काहीतरी अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
अखेर 2017 मध्ये कोहली आणि अनुष्काने इटलीमध्ये गुपचूप लग्न केले आणि आपल्या अनामिक नात्याला पती-पत्नी असे नाव दिले. त्यानंतर आजपर्यंत दोघांचे नाते कायम आहे. दोघांनी एक मुलगी ही आहे आणि आता बातम्यांवर विश्वास ठेवला तर अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे.
विराट कोहलीने याआधी कितीही अफेअर केले असले तरीदेखील एक पती म्हणून तो कायम अनुष्काच्या पाठीमागे उभा राहतो..
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी