भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर लगेचच आपले नाव कमावले. सध्या त्याचे नाव पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये घेतले जाते. क्रीजवर राहून दीर्घ खेळी खेळणे हा रोहित शर्माचा स्वभाव आहे. कदाचित याच कारणामुळे चाहतेही त्याच्यावर इतके प्रेम करतात.
रोहित शर्माचे षटकार खास आहेत आणि प्रेक्षकांना त्याचे एरियल शॉट्स पाहायला आवडतात. या वादळी खेळाडूचे शॉट्स आकर्षक आहेत जे प्रेक्षकांनी अनेकदा पाहिले आहेत. भारतीय संघात आल्यानंतर रोहित शर्माने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, तो सातत्याने मोठ्या खेळाडूंचे रेकॉर्ड मोडत आहे. विश्वचषक 2023 मध्ये त्याने सचिन तेंडुलकरचे अनेक मोठे विक्रम मोडले. मात्र रोहित शर्माचे हे काही विक्रम विराट कोहली ला मोडणे शक्य होणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत रोहित शर्माचे ते विक्रम जे विराट कोहली टी-२० मध्ये नाही मोडू शकत.
रोहित शर्मा देखील कोणत्याही बाबतीत विराट कोहलीपेक्षा कमी नाही. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये असे काही विक्रम केले आहेत जे विराटला मोडणे कठीण आहे. आज या खास लेखात आम्ही तुम्हाला रोहित शर्माने केलेल्या अशा 3 विक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे विराट कोहलीही मोडू शकत नाही.
3. टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके
T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 121* धावा आहे. रोहितने शेवटचे शतक 17 जानेवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मध्ये झळकावले आहे. रोहित नंतर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो ३-३ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले होते. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात त्याने 66 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांसह 106 धावा केल्या होत्या . यासह टी-२० मध्ये शतक झळकावणारा तो सुरेश रैनानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
त्याचे दुसरे आणि सर्वात मोठे शतक 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध होते. इंदूरमध्ये झालेल्या या सामन्यात त्याने 43 चेंडूत 12 चौकार आणि 10 षटकारांसह 118 धावा केल्या. रोहितने श्रीलंकेविरुद्ध 2, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक आणि इंग्लंडविरुद्ध एक शतक झळकावले आहे. जेव्हा विराट कोहलीच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये एकही शतक नाही.
2. एका डावात सर्वाधिक षटकार
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. इंदोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या ११८ धावांच्या खेळीत रोहितने १० षटकार ठोकले होते. या खेळीत त्याने 12 चौकारही मारले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने T-20I सामन्याच्या एका डावात सर्वाधिक 6 षटकार ठोकले आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती. विराट हा उत्कृष्ट फलंदाज आहे पण जोखीममुक्त क्रिकेट खेळल्यामुळे तो षटकारांपेक्षा अधिक चौकार मारण्यात विश्वास ठेवतो. त्यामुळे रोहितला मागे टाकणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे.
1. सर्वात वेगवान शतक
सध्या T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या नावावर आहे. डेव्हिड मिलरने 29 ऑक्टोबर 2017 रोजी बांगलादेशविरुद्धच्या पोस्टर सामन्यात केवळ 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते. जर आपण रोहित शर्माबद्दल बोललो तर, शर्माने 22 डिसेंबर 2017 रोजी इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते.
भारतीय संघाचा उपकर्णधार आणि तुफानी फलंदाज रोहित शर्माने 22 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि 35 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात टीम इंडियाने 260 धावा केल्या होत्या. रोहितने त्या सामन्यात 43 चेंडूत एकूण 118 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि 10 षटकार मारले गेले होते.
विराट कोहली कदाचित रोहितचा हा विक्रम कधीच मोडू शकणार नाही, कारण रोहितप्रमाणे विराट षटकार मारण्यात रोहित शर्माइतका तरबेज नाही. तुम्हाला काय वाटत वरीलपैकी कोणते विक्रम विराट कोहली मोडू शकतो..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…