कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये घडवला विराट विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला जगातला एकमेव खेळाडू…

0
2
कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये घडवला विराट विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला जगातला एकमेव खेळाडू...

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयपीएलमध्ये मोठा विक्रम केला आहे. मंगळवारी आयपीएलच्या पंधराव्या सामन्यात लखनऊ सुपर जायन्ट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने हा विक्रम केला. असा विक्रम करणारा तो एक आयपीएल मधला एकमेव खेळाडू आहे. 

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात एकाच मैदानावर 100 सामने खेळणारा एकमेव खेळाडू ठरला .

विराटचे शतक एक , विक्रम झाले अनेक! एकाच सामन्यात कोहलीने मोडले एवढे विक्रम...!

आयपीएलच्या इतिहासात एकाच मैदानावर 100 सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने 100 सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहली 2008 पासून आरसीबी च्या संघाकडून खेळतोय. 2014 पासून तो या संघाचे नेतृत्व देखील करतोय. मात्र त्याला एकदाही आयपीएलची ट्रॉफी आपल्या संघाला जिंकून देता आली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या या खेळाडूने आयपीएल मध्ये देखील विक्रमाचे मनोरे रचले आहे. लवकरच तो 8000 धावा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.

विराट कोहलीच्या नंतर रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना सर्वाधिक 80 सामने वानखेडे स्टेडियमवर खेळले आहेत. महेंद्रसिंग धोनी याने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर 69 सामने खेळले आहेत.

विराट कोहली एक सर्व महाकालीन खेळाडू आहे. त्याने 522 सामन्यात 80 शतके आणि 149 अर्धशतके ठोकली आहेत. ज्यात 26,733 धावांचा समावेश आहे. क्रिकेट जाणकार तर या फलंदाजाला सचिन तेंडुलकरचा उत्तर अधिकारी मानतात. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. 35 वर्षाच्या या खेळाडूने 240 सामन्यात सात शतके आणि 52 अर्धशतकासह सात हजार 444 धावा केल्या आहेत. भारतीय संघासाठी त्याने 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र या खेळाडूला एकदाही आयपीएल चषक जिंकून देता आला नाही.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, सुरेश रैनाला मागे सोडत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू...

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत देखील तो जबरदस्त फॉर्मत आहे. त्याचा हा परफॉर्मन्स कायम राहिला तर ,आरसीबीचे आयपीएल चषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ हवी आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने कौटुंबिक कारणामुळे माघार घेतली होती त्यामुळे त्याला t20 विश्वचषक स्पर्धेमध्ये घेऊ नये असे बोलले जात होते.

टी-20 संघामध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी यंदाच्या आयपीएल स्पर्धेमध्ये त्याला धावा काढावेच लागतील. भारतीय क्रिकेट संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या विराट कोहलीने जर आयपीएलमध्ये भरभरून धावा काढल्या तर येणाऱ्या टी-20 स्पर्धेमध्ये तो सलामीला खेळताना दिसून येईल.

कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये घडवला विराट विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला जगातला एकमेव खेळाडू...

आयपीएल मध्ये आरसीबीच्या संघात यंदा विराट कोहली सलामीला खेळतोय. डुप्लेसी आणि विराटच्या जोडीने समाधानकारक सुरुवात करून दिली नसली तरी विराट मात्र भरघोस धावा काढून ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये आहे. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने  धावांचा पाऊस पडला आहे प्रत्येक हंगामा त्याच्याकडून धावांची अपेक्षा असते.

प्रत्येक हंगामामध्ये तो हिट ठरला आहे. विराट  आणखीन तीन -चार वर्ष सहज क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे अनेक विक्रमांचे मनोरे उभारले जाऊ शकतात.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here