ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
हार्दिक पांड्या जेव्हापासून मुंबई इंडियन संघाचा कर्णधार बनला आहे तेव्हापासून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी रोहित शर्माचे नाव घेऊन पंढरीला मोठमोठ्याने चिडवत होते. काल असाच एक क्षण पुन्हा पाहायला मिळाला.
गुरुवारी हार्दिक पांड्या आरसीबी विरुद्ध च्या सामन्यात फलंदाजी करण्यास मैदानात उतरला तेव्हा वेळेस चाहत्यांनी त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला परंतु विराट कोहलीला हे सहन झाले नाही त्याने चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन करतात स्टेडियम मधील माहोल बदलून गेले.
विराट कोहलीचा हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो फॅन्सला हार्दिकला न चिडवण्याचे आवाहन करत आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला त्यावेळेस कोहलीने आपली रिएक्शन दिली. त्यानंतर संपूर्ण मैदानातले माहोल बदलून गेले आणि सर्वजण रोहित रोहितच्या ऐवजी हार्दिक पंड्याचे नारे देऊ लागले.
या घटनेनंतर समालोचकांनी देखील बराच वेळ यावर चर्चा करत होते. त्यांनी विराट कोहलीचे तोंड भरून कौतुक केले. यासह सोशल मीडियावर देखील विराट कोहली चे कौतुक होत आहे. त्यांच्यामध्ये खेल भावना राखण्यासाठी किंग कोहलीने मोठे काम केले आहे.
यापूर्वी रोहित शर्मा देखील राजस्थान रॉयल विरुद्धच्या सामन्यात चाहत्यांना शांत राहण्याचे आव्हान केले होते. त्याने चाहत्यांना हूटिंग बंद करण्याचे आवाहन केले होते. जेव्हा मैदानामध्ये या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या आव्हान नंतर मैदानातले वातावरण बदलून गेले, तेव्हा हार्दिक पांड्या देखील खुशीत दिसून आला.
त्यानंतर हार्दिक पंड्या देखील आक्रमक शैली शैलीने फलंदाजी करू लागला. सहा चेंडूत तीन षटकार ठोकत नाबाद 21 धावा काढल्या आणि आरसीबीला 27 चेंडू आणि सात विकेट राखून पराभूत केले. याच दरम्यान रोहित शर्माचा देखील एक व्हिडिओ चर्चेत राहिला आहे ज्यात आकाश अंबानीच्या सोबत दिसून येत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.