“विराट कोहलीला आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर..” या संघाकडून खेळून मिळवू शकतो ट्रॉफी; दिग्गाजाने दिला विराट कोहली कोहलीला सल्ला.!

0
2

विराट कोहली: 15 डावात 741 धावा, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. असे असतानाही विराट कोहली पुन्हा एकदा निराश झाला. त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा एकदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले.

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात बेंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आणि अशा प्रकारे सलग 17 व्या वर्षी कोहली आणि त्याचा संघ रिकाम्या हाताने परतला. यामुळे आयपीएल ट्रॉफीशिवाय कोहलीची कारकीर्द संपणार का?, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. की ट्रॉफी जिंकण्यासाठी कोहलीने बेंगळुरू सोडावे?

IPL 2024 Play off, RCB vs RR: एलीमिनेटर सामन्यात विराट कोहलीइतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर, आयपीएलच्या इतिहास कोणताही खेळाडू करू शकला नाहीये असी कामगिरी..

पहिल्या हंगामापासून विराट कोहली आरसीबीच्या ताफ्यात.

विराट कोहली 2008 मधील IPL च्या पहिल्या सत्रापासून बेंगळुरूचा भाग आहे आणि IPL इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याने सर्व हंगाम फक्त एकाच संघासाठी खेळले आहेत. याबद्दल कोहली आणि बेंगळुरूचे खूप कौतुक केले जात असताना, इतक्या वर्षांतही जेतेपद न जिंकल्यामुळे त्यांची अनेकदा खिल्ली देखील उडवली जाते. कधी याचे कारण कोहलीचे कर्णधारपद आणि त्याचा फ्रँचायझीवर झालेला परिणाम असल्याचे सांगितले जाते, तर कधी संपूर्ण फ्रेंचायझीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात.

आता कारण काहीही असो पण सत्य हे आहे की, विराट कोहलीची आयपीएल ट्रॉफीची भूक कायम आहे. राजस्थानविरुद्धच्या ताज्या पराभवानंतर पुन्हा एकदा आवाज उठवला जात आहे की ,कोहलीने ही फ्रँचायझी सोडली पाहिजे आणि पुन्हा एकदा ही सूचना कोहलीचा खास मित्र आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन देत आहे, ज्याने कोहलीबद्दल यापूर्वीही बोलले होते.

Viral Video: विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये अश्रू तर दिनेश कार्तिकची विदाई, RRVSRCB सामन्यातील भावूक व्हिडीओ तुफान व्हायरल..

आयपीएल एलिमिनेटर सामन्यात समालोचन करणाऱ्या पीटरसनने बेंगळुरूच्या पराभवानंतर सांगितले की, जगभरातील विविध खेळांतील महान खेळाडूंनी यश मिळवण्यासाठी संघ बदलले आहेत आणि विराट कोहलीलाही असेच काहीतरी करण्याची गरज आहे.

Viral Video: विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये अश्रू तर दिनेश कार्तिकची विदाई, RRVSRCB सामन्यातील भावूक व्हिडीओ तुफान व्हायरल..

या संघासह आयपीएल जिंकू शकतो विराट कोहली.

कोहलीसोबत बेंगळुरूकडून खेळलेल्या पीटरसनने सांगितले की, सातत्यपूर्ण कामगिरी करूनही आणि पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकूनही  फ्रँचायझी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली आहे. तो म्हणाला की ,कोहली आयपीएल ट्रॉफीसाठी पात्र आहे आणि त्याने अशा संघात सामील व्हावे जे त्याला मदत करू शकेल.

त्यानंतर पीटरसनने कोहलीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल अशा संघाचे नाव सांगितले. तो म्हणाला की दिल्ली कॅपिटल्स हा संघ आहे, कारण कोहली देखील दिल्लीचा आहे, त्याचेही तेथे घर आहे आणि तो आपल्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवू शकतो.

"विराट कोहलीला आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर.." या संघाकडून खेळून मिळवू शकतो ट्रॉफी; दिग्गाजाने दिला विराट कोहली कोहलीला सल्ला.!

पीटरसनने क्रिस्टियानो रोनाल्ड, डेव्हिड बेकहॅम आणि हॅरी केन यांसारख्या फुटबॉल महान खेळाडूंचे उदाहरण देखील दिले, ज्यांनी आपले पहिले संघ सोडले आणि जेतेपदांच्या आशेने इतर संघात गेले. पीटरसन म्हणाला की, कोहलीप्रमाणेच दिल्लीही विजेतेपदासाठी आतुर आहे आणि अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांना मदत करू शकतात.


Dinesh Kartik Retired From IPL: सामना गमावताच दिनेश कार्तिकने जाहीर केली निवृत्ती, आरसीबीच्या खेळाडूंकडून मैदानावर दिनेशसाठी ‘गार्ड ऑफ ऑनर’, पहा व्हिडीओ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here