Virat Kohli new record in IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काल सोमवारी सामना झाला. या सामन्यांमध्ये विराट कोहलीने एक मोठा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीने या सामन्यात तीन चौकार लगावताच आयपीएलमध्ये एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजस बंगळुरूच्या संघाला हैदराबाद संघाने 288 धावांचे टार्गेट दिले होते.
Virat Kohli new record in IPL: विराट कोहली ठरला आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारा खेळाडू.(most fours in ipl)
विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यांमध्ये 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने चार सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. यासोबतच त्याने आयपीएल मध्ये 926 चौकार आणि षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार चौकार ठोकणारा खेळाडू बनला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहेत. शिखर धवन ने आयपीएलमध्ये 920 वेळा चेंडू सीमारेषा पार केला आहे.
विराट कोहलीने t20 क्रिकेटमध्ये 12,355 धावा केल्या आहेत. तो टी20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या ॲलेक्स हेल्स याला पाठीमागे टाकले आहे. विराट आता चौथ्या स्थानावर आला आहे. एलेक्स हेल्स ने टी20 क्रिकेटमध्ये 12,319 धावा केल्या होत्या तर टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नवावर आहे. त्याने 463 सामन्यात 14,565 धावा केल्या आहेत तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा शोध मलिक आहे ज्याने 542 सामन्यात सामन्यात 13,360 धावा केल्या आहेत. वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने 12910 धावा करत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू (Players who smashed most fours in ipl)
-
926 चौकार – विराट कोहली (678 चौकार, 248 षटकार)
-
920 चौकार – शिखर धवन (768 चौकार, 152 षटकार)
-
898 चौकार – डेव्हिड वॉर्नर (662 चौकार, 236 षटकार)
-
854 चौकार – रोहित शर्मा (582 चौकार, 272 षटकार)
-
७६१ चौकार – ख्रिस गेल (४०४ चौकार, ३५७ षटकार)
-
709 चौकार – सुरेश रैना (506 चौकार, 203 षटकार)
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..