‘विक्रम वीर’ विराट कोहली नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात सहा धावा करताच होईल विक्रम

'विक्रम वीर' विराट कोहली नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात सहा धावा करताच होईल विक्रम

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024 सुरु होण्यासाठी आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पहिला सामाना चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी याच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आत्तापर्यंत पाच वेळा IPL टायटल जिंकले आहे तर आरसीबीला एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही. सीएसके विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली सहा धावा करताच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम करण्याची संधी आहे.

‘रन मशीन’ या नावाने ओळखला जाणारा विराट कोहली हा जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाजापैकी एक आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई विरुद्ध त्याने सहा धावा केल्या तर तो टी 20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला टी20 मध्ये इतक्या धावा करता आल्या नाहीत.

विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 376 सामन्यात 11 हजार 994 धावा केल्या आहेत. ज्यात आठ दमदार शतकांचा समावेश आहे तर 91 अर्धशतके देखील ठोकली आहेत. टी20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्याने 14562 धावा केल्या आहेत.

'विक्रम वीर' विराट कोहली नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात सहा धावा करताच होईल विक्रम

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे. तसेच त्याचे सर्वाधिक फॅन फॉलोइंग आहेत. अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने आरसीबीला विजय मिळवून दिले आहेत. 2008 ते 23 पर्यंत आयपीएल मधील 16 सीजन मध्ये एकाच संघाकडून खेळला आहे. एकाच संघात आयपीएल मध्ये एकाच संघाकडून खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे कोहलीने आयपीएल मध्ये 7263 धावा केल्या आहेत ज्यात सात शतकांची नोंद आहे.

टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:

  1. क्रिस गेल- 14562 रन

  2. शोएब मलिक- 13338 रन

  3. कायरन पोलार्ड- 12899 रन

  4. एलेक्स हेल्स- 12295 रन

  5. डेविड वॉर्नर- 12065 रन

  6. विराट कोहली- 11994 रन


    ==

    आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *