Virat Kohli Records in Test Cricket: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास; तेंडुलकर, द्रविडचा विक्रम मोडत ठरला नंबर १

Virat Kohli Record Test Cricket: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दुसऱ्या डावात आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.

यानंतर आता विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. एक विशेष कामगिरी करत विराट कोहलीने आता टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मागे टाकले आहे.

Virat Kohli Records in Test Cricket: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज

IND vs SA 1st Test: 'बॉक्सिंग डे टेस्ट' म्हणजे काय? आजच्या कसोटीला बॉक्सिंग डे टेस्ट का म्हटलं जातंय? वाचा सविस्तर..

सेंच्युरियन मैदानावर विराट कोहलीने दुसऱ्या डावात ७६ धावांची खेळी केली. आता विराट कोहली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत विराट कोहलीने वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. विराट कोहलीच्या आता कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8790 धावा झाल्या आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८७८१ धावा आहेत.

या यादीत टीम इंडियाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव प्रथम येते. सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 15921 धावा आहेत, आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज त्याचा विक्रम मोडू शकलेला नाही. सचिन व्यतिरिक्त राहुल द्रविडच्या नावावर 13265 आणि सुनील गावस्करच्या नावावर 10122 धावा आहेत.

सेंच्युरियन कसोटीत विराटने 114 धावा केल्या होत्या.

Virat Kohli Records in Test Cricket: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास; तेंडुलकर, द्रविडचा विक्रम मोडत ठरला नंबर १

विराट कोहलीने सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात ३८ धावा आणि दुसऱ्या डावात ७६ धावा केल्या. विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 114 धावा केल्या. विराट कोहली दुसऱ्या डावात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता पण त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणत्याही भारतीय फलंदाजाची साथ मिळाली नाही. विराट कोहली एका बाजूला उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या. शेवटी विराटने टीम इंडियाला एवढ्या मोठ्या पराभवापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराटने आपली विकेट गमावली.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *