RCB vs CSK live: पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास,अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज..!

RCB vs CSK live: पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास,अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

RCB vs CSK live: भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने IPL 2024 च्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. चेन्नई विरुद्ध खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2024 च्या सलामीच्या सामन्यात या खेळाडूने ही मोठी कामगिरी केली आहे. हा इतिहास रचणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

त्याचबरोबर हा इतिहास घडवणारा विराट सहावा फलंदाज ठरला आहे. कोहलीशिवाय 5 परदेशी खेळाडू आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे. कोहलीने चेन्नईविरुद्ध कोणता इतिहास रचला ते आम्ही तुम्हाला सांगतो.

RCB vs CSK live:  विराट कोहलीने कोणता इतिहास रचला?

विराट कोहलीने चेन्नई विरुद्ध ३१ धावा करत एक मोठा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीपूर्वी असे फक्त 5 फलंदाज आहेत ज्यांच्या नावावर 12 हजारांहून अधिक टी-20 धावा आहेत. विशेष म्हणजे या 5 फलंदाजांपैकी एकही फलंदाज भारतीय नाही.

T20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करणारा कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीनंतर रोहित शर्माच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 11156 धावा केल्या आहेत. रोहितनंतर शिखर धवनचे नाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू शिखर धवन याने T20 क्रिकेटमध्ये एकूण 9645 धावा केल्या आहेत.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *